शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पॅरिसवरील इसिसचे हल्ले मुंबईसारखे

By admin | Updated: August 20, 2016 01:27 IST

इसिसने पॅरिसमध्ये केलेले अतिरेकी हल्ले हे मुंबई हल्ल्याच्या धर्तीवरच होते, असा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने एका अध्ययनानंतर केला आहे. या अतिरेक्यांनी मुंबईतील

संयुक्त राष्ट्र : इसिसने पॅरिसमध्ये केलेले अतिरेकी हल्ले हे मुंबई हल्ल्याच्या धर्तीवरच होते, असा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने एका अध्ययनानंतर केला आहे. या अतिरेक्यांनी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा आणि या प्रकारच्या अन्य हल्ल्यांचा अभ्यास केला होता. या माध्यमातून भ्रम निर्माण करण्याचा, तसेच अधिकाधिक लोकांना लक्ष्य करण्याचाही त्यांचा हेतू होता, असेही या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे हा अहवाल ‘अ‍ॅनालिटिकल सपोर्ट अ‍ॅण्ड सँक्शन्स मॉनिटरिंग टीम’कडून सादर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, इसिसच्या अतिरेक्यांनी पॅरिस आणि ब्रसेल्समधील हल्ल्यांसारखे अनेक हल्ले करताना जी कार्यप्रणाली अवलंबिली ती विशेष रणनीती होती. कारण, या हल्ल्यांच्या विरुद्ध कारवाई करणे अवघड होऊन जावे, अशीच या अतिरेक्यांची व्यूहरचना होती. या अहवालात म्हटले आहे की, अतिरेक्यांनी मुंबई हल्ला आणि नैरोबीतील वेस्टगेट शॉपिंंग मॉलमधील हल्ल्यांसह यासारख्याच अन्य हल्ल्यांचा अभ्यास केला होता. अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटच्या (एक्यूआयएस) काही सदस्यांना संयुक्त राष्ट्राच्या दहतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. यातील काही भारतीय वंशाचे सदस्य आहेत. एक्यूआयएसशी संबंधित अफगाणिस्तानातील अल कायदाच्या सदस्यांची संख्या ३०० असल्याचा अंदाजही या अहवालात वर्तविण्यात आला आहे. अफगाणिस्तानात अल कायदाचे समर्थक एक्यूआयएसमध्ये सहभागी झाले आहेत. याचा अध्यक्ष भारतीय वंशाचा मौलाना आसिम उमर आहे. त्याला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. या समूहातील मुख्य अतिरेकी हे पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि मालदीवचे रहिवासी आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. काय होती घटना?पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबर २०१५ रोजी एका क्रीडा संकुलात, रेस्टॉरंटमध्ये आणि एका कंसर्ट हॉलमध्ये हे हल्ले करण्यात आले होते. मुंबईतील हल्ल्यांसारखीच पद्धत येथे वापरण्यात आली होती. यात १३० जणांचा मृत्यू झाला होता, तर मुंबई हल्ल्यात १६० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.