शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातील घटनादुरुस्तीने 'हुकूमशहा' बनला आसिम मुनीर! सत्ता अनियंत्रित, UN ने दिला स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 17:36 IST

पाकिस्तानातील या घटनादुरुस्तीसंदर्भात अनेक संस्थांसह संयुक्त राष्ट्रांनीही (UN) चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या घटनादुरुस्तीने तेथील सत्ता संतुलन मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. या नव्या सत्ता बदलाने लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. तर न्यायपालिकेच्या (Judiciary) अधिकारांमध्ये मोठी कपात झाली आहे. पाकिस्तानातील या घटनादुरुस्तीसंदर्भात अनेक संस्थांसह संयुक्त राष्ट्रांनीही (UN) चिंता व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाचे प्रमुख वोल्कर टर्क यांनी यासंदर्भात शुक्रवारी एक कठोर निवेदन जारी करत गंभीर इशारा दिला आहे. घाईगडबडीत केलेल्या या दुरुस्त्या, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला बाधा पोहोचवतात, असे त्यांनी म्हटले आहे. टर्क यांच्या मते, यामुळे सैन्याचा हस्तक्षेप वाढून नागरिक सरकारची भूमिका कमकुवत होण्याची भीती आहे. यामुळे कायद्याच्या राज्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.

UN चा स्पष्ट इशारा - टर्क यांनी या घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत, कायदे तज्ज्ञांचा सल्ला, कोणतीही सार्वजनिक चर्चा अथवा व्यापक चर्चा न करता हा बदल केला आहे. हा बदल लोकशाही प्रक्रियेविरुद्ध आहे, पाकिस्तानमधील मानवाधिकार आणि कायद्याचे संरक्षण करणाऱ्या संस्थांच्या विरुद्ध आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विशेषतः न्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ज्या नवीन तरतुदींमुळे न्यायाधीशांची नियुक्ती (Appointment) आणि बदली (Transfer) करण्याचे अधिकार बदलले आहेत, यामुळे राजकीय हस्तक्षेप वाढून न्यायपालिका कार्यपालिकेच्या नियंत्रणाखाली येण्याचा धोका आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

27व्या घटनादुरुस्तीवर विशेष आक्षेप -टर्क यांनी 27व्या घटनादुरुस्तीवर विशेष आक्षेप नोंदवला. या दुरुस्तीमुळे राष्ट्रपती आणि फील्ड मार्शल यांना आजीवन फौजदारी खटल्यांपासून आणि अटकेपासून संरक्षण मिळते. हा मानवाधिकार तत्त्वे आणि लोकशाही नियंत्रणाच्या ढाच्या विरोधातला बदल आहे, जो पाकिस्तानच्या लोकशाही भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो, असेही टर्क  यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Amendment: Asim Munir becomes 'dictator,' UN warns of unchecked power.

Web Summary : Pakistan's amendment strengthens army chief Asim Munir, weakens judiciary. UN warns it undermines judicial independence, threatens democracy, and human rights due to increased military influence and curtailed judiciary authority. Concerns raised about lifetime immunity for president and field marshals.
टॅग्स :United StatesअमेरिकाPakistanपाकिस्तान