बीजिंग : शांघायमधील एका बालवाडीतील तीन बालिकांची छेडछाड केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. झांग असे आरोपीचे नाव आहे. त्याने यांगपू जिल्ह्यातील चांगक्शियानगियुशू बालवाडीत शिकणाऱ्या बालिकांची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या तिघी स्थलांतरित मजुराच्या मुली आहेत. झांग या बालवाडीचा कर्मचारी नाही. तो पत्नीऐवजी काम करण्यासाठी आला होता. (वृत्तसंस्था)
बालिकांची छेडछाड करणाऱ्यास अटक
By admin | Updated: June 13, 2014 03:59 IST