शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अर्मेनियात सशस्त्र गटाचा पोलीस इमारतीवर कब्जा

By admin | Updated: July 18, 2016 06:09 IST

अर्मेनियातील सशस्त्र गटाच्या नेत्याने रविवारी येथील पोलीस इमारत ताब्यात घेऊन एका पोलिसाला ठार मारले

येरेव्हान (अर्मेनिया) : अर्मेनियातील सशस्त्र गटाच्या नेत्याने रविवारी येथील पोलीस इमारत ताब्यात घेऊन एका पोलिसाला ठार मारले व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर कित्येकांना ओलीस ठेवले आहे. हा गट सध्या तुरुंगात असलेल्या विरोधी नेत्याशी संबंधित आहे. अर्मेनियाचे अध्यक्ष सेर्झह सर्किसियन यांनी राजीनामा द्यावा आणि राजकीय कैद्यांची सुटका करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे एका बंदूकधाऱ्याने म्हटले. देशात बंड सुरू असल्याच्या अफवांचे खंडन देशाच्या सुरक्षादलांनी सोशल मिडियाद्वारे केले आहे. येथील पोलीस पलटणीच्या इमारतीत सशस्त्र लोकांचा गट शिरला व त्याने हिंसाचार घडवू अशी धमकी देत तेथील लोकांना ओलीस ठेवले, असे अर्मेनियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सेवेने निवेदनात म्हटले. यात एक पोलीस ठार तर दोघे जखमी झाले. दोन ओलिसांची सुटका झाली, असेही त्यात म्हटले. सशस्त्र लोकांपैकी एकाने येरेव्हानच्या एरेबुनी जिल्ह्यातील या पोलीस ठाण्यात ओलीस धरण्यात आलेल्यांमध्ये देशाचे उप पोलीस प्रमुख असल्याचे सोशल मिडियाद्वारे सांगितले. ओलिसांची भेट संसद सदस्य निकोल पशिनयान यांनी घेऊन नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या ताब्यात आठ पोलीस असून त्यापैकी एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांनी सोडून दिले. (वृत्तसंस्था)>झिरेर यांची सुटका कराअर्मेनियात दैनंदिन व्यवहार सुरळीत असून नागरिकांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पोलीस बजावत आहेत. देशात बंड झाल्याच्या अफवांचे निवेदनात खंडन करण्यात आले आहे. विरोधी राजकीय नेते झिरेर सिफिलयान यांना शस्त्र बाळगल्याबद्दल गेल्या महिन्यात अटक करण्यात आली असून त्यांची सुटका करावी अशी या गटाची मागणी आहे.