शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अॅमेझॉनवर विकले जाणारे अॅपलचे 90 टक्के चार्जर बनावट

By admin | Updated: October 20, 2016 18:51 IST

अॅमेझॉन, ग्रुपॉनसारख्या ऑनलाइन विक्री करणाऱ्या ऑनलाइन साइट्सवर विकले जाणारे अॅपलचे 90 टक्के चार्जर, यूएसबी केबल, यूएसबी पॉवर अॅडॉप्टर बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

 
ऑनलाइन लोकमत
सॅन फ्रॅन्सिस्को, दि. 20 - तुम्ही अॅमेझॉनवरून अॅपलची उत्पादने खरेदी करत असाल तर सावधान. अॅमेझॉन, ग्रुपॉनसारख्या ऑनलाइन विक्री करणाऱ्या साइट्सवर विकले जाणारे  अॅपलचे  90 टक्के चार्जर, यूएसबी केबल,  यूएसबी पॉवर अॅडॉप्टर बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अॅपलच्या नावे बनावट उत्पादनांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या मोबाइल स्टार एलएलसीविरुद्ध अॅपलने न्यायालयात खटला दाखल केला आहे. 
अॅपलने कॉपीराइट उल्लंघन प्रकरणी प्रत्येकी 1 लाख 50 डॉलर आणि ट्रेडमार्कचा गैरवापर केल्याप्रकरणी दोन दशलक्ष डॉलरचा दावा दाखल केला आहे. तसेच अॅपलच्या नावे खपवली जाणारी बनावट उत्पादने ही ज्वलनशील असून, त्यामुळे ग्राहकांसाठी ती धोकादायक असल्याचे म्हटले आहे. 
"आयफोनचे निर्माते असलेल्या अॅपलची अॅमेझॉनवर विकली जाणारी दहापैकी नऊ उत्पादने ही बनावट असतात," असे अॅपलने ट्रेडमार्क उल्लंघनप्रकरणी गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले. अॅपलने अॅमेझॉनवरून पॉवर प्रॉडक्ट खरेदी केले होते.  पडताळणी केली असता हे प्रॉडक्ट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अॅपलने याबाबतची माहिती अॅंमेझॉनला दिली. दरम्यान, खरेदी करण्यात आलेल्या या बनावट पॉवर प्रॉडक्टचे उत्पादन मोबाइल स्टारने केले होते," असा दावा या खटल्यात अॅपलकडून करण्यात आला आहे. तर अॅमेझॉनवर बनावट उत्पादनांना थारा दिला जात नाही. उत्पादनांचा खरेपणा काटेकोरपणे तपासूनच ती विक्रीसाठी ठेवली जातात. असे अॅमेझॉनने  म्हटले आहे.