शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

कसेही करा, पण हल्ले चढवा!

By admin | Updated: July 16, 2016 02:54 IST

आयएसचा (इस्लामिक स्टेट) प्रवक्ता अबू मुहम्मद अल-अदनानी याने दोनवेळा (सप्टेंबर २०१४ व जानेवारी २०१५मध्ये) जगातील मुस्लिमांना अमेरिकन्स, फ्रेंचमन्ससह युरोपियन्सवर

नीस : आयएसचा (इस्लामिक स्टेट) प्रवक्ता अबू मुहम्मद अल-अदनानी याने दोनवेळा (सप्टेंबर २०१४ व जानेवारी २०१५मध्ये) जगातील मुस्लिमांना अमेरिकन्स, फ्रेंचमन्ससह युरोपियन्सवर अशा प्रकारचे वाहनांचे हल्ले करण्याचे आवाहन केले होते. फ्रान्सवर झालेला हा हल्ला त्याचेच द्योतक असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अबू मुहम्मद अल-अदनानी याने पहिल्या संदेशात म्हटले होते की, जर तुम्हाला आयईडी किंवा गोळी मिळाली नसेल तर अश्रद्ध अमेरिकन किंवा फ्रेंच किंवा त्यांचा सोबती वेगळा काढून त्याचे डोके खडकावर आदळा किंवा सुऱ्याने त्याची हत्या करा किंवा तुमची कार त्याच्या अंगावर घाला किंवा त्याला उंच इमारतीवरून खाली फेका, त्याचा गळा दाबा किंवा त्याला विष पाजा.इस्लामी स्टेटची प्रेरणानीसमधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही गटाने घेतलेली नसली तरी इस्लामिक स्टेटची (आयएस) प्रेरणा घेतलेल्या एखाद्या व्यक्तीने (लोन वुल्फ) तो घडवला असावा अशी शक्यता तज्ज्ञांना वाटत आहे. असे हल्ले घडवून आणले जातील, असे आयएसने दोनदा म्हटले होते. हल्लेखोराने जाणूनबुजून जमावातून ट्रक नेला. हल्लेखोर ३१ वर्षांचा फे्रंच ट्युनिशियन असून, ट्युनिशियामध्ये सर्वाधिक विदेशी लढवय्ये (इराक आणि सिरियात मिळून सहा हजार) असल्याचे सौफन गु्रपने म्हटले. या गटाचे जिहादी संघटनांकडे बारकाईने लक्ष असते. आणखी सहा हजार लढवय्ये युरोपमधून युद्धग्रस्त देशांत गेले आहेत. त्यातील बहुसंख्य हे फ्रान्समधील आहेत.बेल्जियममध्ये पुढील आठवड्यात राष्ट्रीय दिन साजरा होत आहे. दरम्यान, फ्रान्समधील हल्ल्यानंतर शुक्रवारी येथे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी ही माहिती दिली. मार्चमध्ये ब्रसेल्सच्या एका विमानतळावर आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात ३२ जण ठार झाले होते. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. तथापि, फ्रान्समधील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सुरक्षा बाळगण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राकडून निषेध फ्रान्समधील या क्रूर, निर्दयी आणि भ्याड हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघाने निषेध केला आहे. जगातील शांतता आणि सुरक्षेसाठी दहशतवाद हा सर्वांत मोठा धोका असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मृतांत २ अमेरिकी : या हल्ल्यात दोन अमेरिकन नागरिक मृत्युमुखी पडले. या व्यक्तींच्या नातेवाइकांना आवश्यक ती मदत अमेरिकेतर्फे दिली जाणार आहे. टेक्सास येथील वृृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नीसमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांत ५१ वर्षीय सीन कोपलॅण्ड आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा ब्रोडी यांचा समावेश आहे. आॅक्टोबर २०१३ : एका गटाने बीजिंगमधील तियानानमेन चौकात स्पोटर््स युटिलिटी व्हेईकल जमावात घुसविली होती. त्यात तीन हल्लेखोर आणि दोन पर्यटक ठार झाले होते. बीजिंगमधील हा पहिला मुख्य हल्ला समजला जातो. हा हल्ला आम्ही घडविल्याचा दावा ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंटने केला होता.मे २०१३ : नायजेरियन वंशाच्या दोन इस्लामी अतिरेक्यांनी लंडनमध्ये ब्रिटिश सैनिक ली रग्बी याच्यावर कार घातली होती. त्याआधी त्यांनी रस्त्यावर त्याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटिश सैनिकांच्या हातून मुस्लिमांच्या झालेल्या मृत्यूचा बदला म्हणून आम्ही हा हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले होते. आॅक्टोबर २०१४ : इस्लाम धर्म स्वीकारलेल्या मार्टिन कौचुर-रौउलेवू याने क्युबेकमध्ये दोन कॅनेडियन सैनिकांना कारखाली चिरडले होते. त्यात एक सैनिक ठार झाला होता. पाठलाग करून मार्टिनला ठार मारण्यात आले. जिहादच्या कारणावरून त्याने हे कृत्य केले होते. हल्लेखोराची पत्नी ताब्यात फ्रान्सच्या नीस शहरातील हल्लेखोराच्या पूर्वीच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हल्लेखोर ३१ वर्षीय मोहम्मद लाहोएज -बुलेल यांचा नेमका हेतू काय होता? याची माहिती घेतली जात आहे. फ्रान्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर विभागाला त्याच्याबाबत काही माहिती नव्हती. दुचाकीस्वारही होता सोबत?हल्लेखोर गर्दीतून ट्रक नेत असताना एका दुचाकीस्वाराला ट्रकचा पिच्छा करताना आपण पाहिले, असे एका जर्मन पत्रकाराने सांगितले. हा दुचाकीस्वार नंतर ट्रकच्या केबिनमधून आत जाण्याचा प्रयत्न करत होता. पण, तो खाली पडला आणि ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्युमुखी पडला. हल्लेखोर मोहम्मद लाहौएज-बुलेल याच्या शेजाऱ्यांची चौकशी करण्यात आली. ट्रकमध्ये त्याचेच ओळखपत्र मिळाले आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी एक बॅग ताब्यात घेतली आणि वस्तूंची झडती घेतली. रात्री साडेदहा वाजता... राष्ट्रीय दिनानिमित्त फ्रान्सच्या नीस शहरात गुरुवारी सकाळपासूनच लगबग सुरू होती. रात्री आतशबाजीही सुरू झाली तेव्हा उपस्थित हजारो नागरिक येथे आनंदोत्सव साजरा करीत होते. नीसस्थित फे्रंच रिव्हियेरा रिसॉर्टमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. रात्री १०.३०च्या सुमारास एक भरधाव ट्रक या गर्दीत घुसला आणि एकच हाहाकार उडाला. काही मिनिटांतच या ट्रकने गर्दीतून नागरिकांना चिरडत २ कि.मी.चे अंतर पार केले. फारफार तर पाच ते दहा मिनिटांच्या या थरारात येथे अक्षरश: मृत्यूने तांडव केले.ट्रम्प म्हणाले, आपण जर याकडे बारकाईने बघितले तर दिसून येईल की, हे युद्ध आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प म्हणाले, हे असेच चालत राहिले तर आमचा समाज वाचणार नाही. जे काही चालू आहे ते भयंंकर आहेहल्ल्यात भारतीय मृत वा जखमी नाही या दहशतवादी हल्ल्यात कोणी भारतीय मृत वा जखमी झालेला नाही अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शुक्रवारी टिष्ट्वटरद्वारे दिली. पॅरिसमधील भारतीय दूतावासाने ३३-१-४०५०७०७० या क्रमांकावर माहिती देण्याची व्यवस्था केली आहे.प्रत्यक्षदर्शी पत्रकार रॉबर्ट होलोवे यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने एक पांढरा ट्रक आला आणि पाहता-पाहता गर्दीत घुसला. लोकांना अक्षरश: चिरडत हा ट्रक पुढे जात होता. जखमी झालेल्यांपैकी किमान १८ जणांची प्रकृती गंभीर आहे. इस्लामी अतिरेक्यांचा हात? या हल्ल्यात इस्लामी अतिरेक्यांचा हात असल्याचा संशय पॅरिसमधील एक अधिकारी फ्रान्सुआ मोलिन्स यांनी व्यक्त केला आहे. हा हल्लेखोर कोणत्या अतिरेकी संघटनेशी जोडला गेलेला होता काय? याबाबत अद्याप पोलीस कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत; पण ज्या पद्धतीने हा हल्ला करण्यात आला त्यावरून यामागे इस्लामी अतिरेकी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर या ट्रकचालकाने त्यांच्यावरही गोळीबार केला.ती कशीबशी वाचलीया हल्ल्यातून बचावलेल्या एका तरुणीने सांगितले की, आपण ट्रकच्या अगदी एका बाजूला होतो म्हणूनच केवळ बचावलो. अर्थात ट्रकमधील स्फोटकांचा स्फोट झाला असता, तर आपलाही मृतदेहच सापडला असता. केवळ नशीब बलवत्तर होते. हे सांगणारी मुलगी बांगलादेशातील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेली भारतीय तरुणी तरुषी जैन हिची खास मैत्रीण होती. तिने स्वत:च तरुषी माझी मैत्रीण असल्याचे सांगितले.हल्ल्याची नवी घातक पद्धतफ्रान्सच्या नीस शहरावर अत्यंत विचारपूर्वक रणनीती आखून हल्ला करण्यात आला. बंदूक किंवा बॉम्बचा वापर न करता एकट्या हल्लेखोराने ८४ लोकांना ठार केले. या हल्ल्यात अनेक लोक गंभीररीत्या जखमी झाले असून, बंदूक आणि बॉम्बशिवाय भयंकर हानी घडवून आणण्याचा दहशतवादाचा हा नवा चेहरा जगासमोर आला आहे.सर्व भारतीय फ्रान्समधील नागरिकांसोबत एकजुटीने उभे आहेत. - प्रणव मुखर्जी, राष्ट्रपतीदहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. - हमीद अन्सारी, उपराष्ट्रपतीहे विवेकहीन हिंसक कृत्य व्याकुळ करणारे आहे. दु:खाच्या या क्षणी भारत आपल्यासोबत आहे. आपण या कृत्याचा निषेध करीत आहोत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधाननीसमधील हा अतिरेकी हल्ला शांती आणि लोकशाही मूल्यांविरुद्ध असल्याचे दर्शवितो. अशा कठीण प्रसंगी आमचा पक्ष फ्रान्सच्या जनतेसोबत आहे. या हल्ल्यातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा लहानसे शहर नीसअतिरेकी हल्ल्यामुळे चर्चेत आलेले नीस हे शहर फ्रान्समधील सर्वांत मोठ्या पाच शहरांपैकी एक आहे. या शहराची लोकसंख्या ३ लाख ४३ हजारांहून अधिक आहे. फ्रान्सच्या दक्षिण पूर्व भागात वसलेल्या या शहराला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२१ चौरस कि.मी. क्षेत्रात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे शहर शुक्रवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्याने हादरून गेले. ज्या ठिकाणी राष्ट्रीय दिनाचा सोहळा सुरू होता, त्याला लागूनही समुद्र आहे.जानेवारी २०१५मध्ये फ्रान्समधील नियतकालिक शार्ली हेब्दोवर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी दोन डझन लोकांना ठार केले होते. शार्लीवरील हा दुसरा मोठा हल्ला होता. नोव्हेंबर २०१५मध्ये दहशतवाद्यांनी येथे रक्तपात घडवून आणला होता. यात आत्मघाती हल्लेखोरांनी पॅरिसमध्ये कन्सर्ट हॉल, स्टेडियम आणि एका उपाहारगृहात धुडगूस घालून १३० जणांचे प्राण घेतले होते. या हल्ल्यात १००हून अधिक लोक जखमी झाले होते.