शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

केव्हाही होईल अणुयुद्धाला सुरूवात, उत्तर कोरियाची धमकी

By admin | Updated: April 14, 2017 22:08 IST

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जॉंग-उन यांच्या सरकारने कधीही अणुयुद्धाला सुरूवात होऊ शकते असं म्हणत अमेरिकेला धमकी दिली

ऑनलाइन लोकमत
प्योंगयांग, दि. 14 - उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जॉंग-उन यांच्या सरकारने कधीही अणुयुद्धाला सुरूवात होऊ शकते असं म्हणत अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेची वाटचाल पाहता ते संपूर्ण जगाला अणुयुद्धाच्या दिशेने नेत आहेत त्यामुळे केव्हाही अणुयुद्धाला सुरूवात होऊ शकते असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे.
 
प्योंगयांग येथील उप मंत्री हान सॉन्ग योल यांनी, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पेनिनसुला क्षेत्रात अशांतता निर्माण झाली असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे एअरक्राफ्ट कॅरिअर दक्षिण कोरियाच्या समुद्ई तटावर तैनात करणं चुकीचं आहे. असं करून अमेरिका आमची कुरापत काढत आहे. त्यांना जर युद्धच करायचं असेल तर कोणत्याही क्षणी आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत अशी धमकी त्यांनी दिली. ट्रम्प यांच्यामुळे तणाव निर्माण झाला असल्याचं ते म्हणाले. डेली मेलने यासंबंधी वृत्त दिलं आहे. 
 
ट्रम्प यांनी 13 एप्रिलला उत्तर कोरियाला इशारा दिला होता. जर चिन उत्तर कोरियाला वठणीवर आणण्यास असमर्थ ठरलं तर आम्ही त्यासाठी समर्थ आहोत असं ट्विट त्यांनी केलं होतं.  त्यावर उत्तर देताना ट्रम्प यांच्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. ते उत्तर कोरियाच्या सैन्याला उकसवत आहेत. जर त्यांना युद्धच हवं असेल तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत, असे रयोलने धमकावले.   
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करून उत्तर कोरियाला इशारा दिल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेला थेट अणुयुद्धाची धमकी दिली आहे. अमेरिका संपूर्ण जगाला अणुयुद्धाच्या दिशेने नेत आहे. अमेरिकेने आमची कुरापत काढली तर कोणत्याही क्षणी आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत, असे उत्तर कोरियाने बजावले आहे. या धमकीमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
याशिवाय उत्तर कोरियाकडून होणाऱ्या अणुचाचणी थांबणार नाहीत. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही अशा चाचण्या घेत राहू, असेही ते म्हणाले.