शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इसिसकडून आणखी एक प्राचीन मंदिर उद्ध्वस्त

By admin | Updated: September 1, 2015 00:24 IST

मागील आठवड्यातच एक मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या इसिसने सोमवारी सिरियाच्या पाल्मिरातील आणखी एक पुरातन मंदिर स्फोटाने उडविले. हा स्फोट एवढा भयंकर होता की

बेरुत : मागील आठवड्यातच एक मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या इसिसने सोमवारी सिरियाच्या पाल्मिरातील आणखी एक पुरातन मंदिर स्फोटाने उडविले. हा स्फोट एवढा भयंकर होता की, परिसर अक्षरश: हादरून गेला.सिरियात इसिस मंदिरांना लक्ष्य करत असून दोन हजार वर्षांपूर्वीच्या या मंदिरात स्फोट घडवून आणत हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केले. हे बेल मंदिर प्राचीन कारवा शहराचा प्रमुख हिस्सा आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या स्फोटात मंदिराचे प्रचंड नुकसान झाले आहे. विटा व स्तंभ जमीनदोस्त झाले आहेत. इसिसने मे महिन्यात पाल्मिरावर नियंत्रण मिळविल्यानंतर येथे विध्वंस सुरू केला आहे. मागील आठवड्यातच प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओत बालशमिन मंदिर उडविल्याचे दाखविण्यात आले होते.बेलच्या या रोमन मंदिराचे नेमके किती नुकसान झाले आहे याचा सध्या अंदाजच लावला जात असून स्थानिक नागरिकांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार स्फोटाची तीव्रता पाहता मंदिराचे मोठे नुकसान झाले असून परिसरात विटा, मातीचे ढीग पडले आहेत. पर्यटकांच्या दृष्टीने हे मंदिर महत्त्वाचे मानले जाते. एका अंदाजानुसार इसिसच्या कब्जापूर्वी या मंदिरात दरवर्षी किमान दीड लाख पर्यटक भेट देत होते. (वृत्तसंस्था)