शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची लढाई इस्लामविरुद्ध नाही

By admin | Updated: February 20, 2015 02:01 IST

अमेरिकेची लढाई ही इस्लामविरुद्ध नाही, तर ती धर्माची विकृती करणाऱ्यांविरोधात असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली.

ओबामांची स्पष्टोक्ती : धर्माची विकृती करणाऱ्यांना आमचा विरोधवॉशिंग्टन : अमेरिकेची लढाई ही इस्लामविरुद्ध नाही, तर ती धर्माची विकृती करणाऱ्यांविरोधात असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली. तसेच इसिस आणि अल काईदा यासारख्या दहशतवादी संघटना म्हणजे कट्टरवादी विचारधारेला जोरकस विरोध करणाऱ्या अब्जावधी मुस्लिमांचा आवाज नाही, असे ते म्हणाले.अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ‘हिंसक कट्टरवादविरोधातील लढा’ या विषयावर व्हाईट हाऊस शिखर परिषदेत बोलताना सांगितले की, ‘आमची लढाई इस्लामशी नाही. इस्लामची विकृती करणाऱ्यांविरोधात आम्ही लढा पुकारला आहे. इसिस आणि अल काईदासारख्या संघटना स्वत:ची भूमिका योग्य असल्याचे गळा काढून सांगत आहेत. ते स्वत:ला धार्मिक नेता आणि इस्लामचे रक्षण करणारे पवित्र योद्धे असल्याचा जगाला भास करून देण्यासाठी खटाटोप करत आहेत.’ इसिस स्वत:ची इस्लामिक स्टेट म्हणून संभावना करत आहे आणि अमेरिका व पाश्चात्त्य देशांची लढाई इस्लामविरोधात असल्याचा दुष्प्रचार करत सुटले आहेत, असेही ओबामा म्हणाले.पाश्चात्त्य आणि इस्लाम वा आधुनिक जीवन आणि इस्लाम हे परस्परविरोधी आहेत, ही दहशतवाद्यांनी पसरविलेली बाब मुस्लिम समुदायाबाहेरील लोकांनी फेटाळून लावण्याचे आवाहन त्यांनी केले. आम्ही या बाबी फेटाळून लावल्या पाहिजेत. कारण त्या पूर्णत: खोट्या आहेत आणि धार्मिकदृष्ट्या दहशतवाद्यांना खरे ठरविण्याचीही चूक आम्ही करता कामा नये. ते धार्मिक नेते नाहीत, तर दहशतवादी आहेत, अशा प्रखर शब्दांत ओबामा यांनी हल्ला चढविला. तीनदिवसीय शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. (वृत्तसंस्था)माझ्यासारखे लोक इसिससारख्या दहशतवादी संघटना इस्लामचे प्रतिनिधित्व करतात, ही धारणा फेटाळून लावतात. मुस्लिम नेत्यांनीही ही धारणा निराधार असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. इसिस आणि अल काईदा यासारख्या दहशतवादी संघटना जागतिक आव्हान आहे. दहशतवादाविरोधात सर्वच देशांनी एकजूट होऊन लढणे गरजेचे आहे.