शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

हवामान बदलाचा अमेरिकी सुरक्षेस धोका

By admin | Updated: May 21, 2015 00:41 IST

हवामान बदलामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. हवामान बदलामुळे देशातील गरिबी, तसेच दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन : हवामान बदलामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. हवामान बदलामुळे देशातील गरिबी, तसेच दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता आहे. अन्न व पाणी यासारख्या संसाधनासंदर्भात वाद निर्माण झाल्याने राजकीय अस्थिरताही येईल, असे व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. हवामान बदलामुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा लगेचच धोक्यात येऊ शकते. या बदलामुळे नैसर्गिक आपत्ती वाढणार असून, मानवी जीवन संकटात येऊ शकते. त्यामुळे विस्थापितांचा ओघ वाढून, अन्न व पाणी यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष होईल, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. हा अहवाल राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हवामान बदलावरील भाषणाआधी प्रसिद्ध केला आहे. ओबामा यांचे हे भाषण अत्यंत महत्त्वाचे मानण्यात येत आहे. हवामान बदल हा अमेरिकेच्या दृष्टीने तातडीचा, वाढता धोका आहे. तीव्र हवामानामुळे निर्वासितांचा ओघ वाढणार आहे, अन्न व पाणी यासारख्या बाबींसाठी संघर्ष वाढणार आहे. (वृत्तसंस्था)बदलणाऱ्या हवामानामुळे संपूर्ण जगात अस्थैर्य निर्माण होईल. पाणी व अन्न यांची टंचाई, नैसर्गिक संसाधनात स्पर्धा, अविकसित, मागास देश तसेच लोकसंख्येत अतिवाढ असे संकटाचे स्वरूप असेल.संसर्गजन्य रोगाची साथ हवामान बदल व जागतिक वास्तव, नागरिकांचे शहरीकरण यामुळे घरे, जमिनी व पायाभूत सेवा उद्ध्वस्त होतील. हवामान बदलामुळे पाण्याची टंचाई वाढेल. अन्नधान्य महाग होईल. जागतिक अर्थव्यवस्थेवरील समाजावरील तसेच सरकारवरील दबाव वाढेल, तसेच हवामान बदलामुळे जागतिक पातळीवर संसर्गजन्य रोगाची साथही पसरण्याचा धोका आहे.