शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी पुराव्यांनी पाकचे वस्त्रहरण

By admin | Updated: July 31, 2016 06:43 IST

पठाणकोट हल्ल्यातील जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी पाकमधील सूत्रधारांच्या संपर्कात होते, असे पुरावे अमेरिकेने दिले

नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यातील जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी पाकमधील सूत्रधारांच्या संपर्कात होते, असे पुरावे अमेरिकेने दिले असून, त्यामुळे पाकिस्तानचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. पठाणकोट हल्ल्यातील चार अतिरेकी आणि पाकिस्तानातील त्यांचा म्होरक्या काशिफ जान यांच्यातील चॅटिंग व संवाद असलेले १ हजार पानांचे दस्तावेज अमेरिकेकडून भारताला मिळाले आहेत.पठाणकोटमधील हल्ला पाकमधूनच नियंत्रित केला जात होता. त्यातील नासीर हुसैन पाकच्या पंजाबचा, अबू बकर गुजरणवालातील, उमर फारुख आणि अब्दुल कय्यूम हे सिंधमधील होते. हे चारही अतिरेकी मारले गेले होते. या काळात ते पाकमधील म्होरक्यांच्या संपर्कात होते. या हल्ल्याचे नियंत्रण करणारा म्होरक्या काशिफ जान याचे पाकिस्तानातील जैशच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबतच्या संभाषणाचा तपशीलही त्यात आहे. एनआयए दस्तावेजांची छाननी करीत आहे. माहितीनुसार, काशिफ जान व्हॉट्स अ‍ॅप व अन्य संपर्क प्लॅटफॉर्मवरून अतिरेक्यांच्या संपर्कात होता. याच मोबाइल क्रमांकावरून त्याचे एक फेसबुक खातेही सक्रिय होते. त्यावरून तो अतिरेक्यांना सूचना देत होता. हल्ल्याच्या वेळी सक्रिय असलेली खाती पाकिस्तानातील दूरसंचार कंपन्यांच्या (टेलिनॉर आणि पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी, इस्लामाबाद) आयपी अ‍ॅड्रेस वापरत होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)>भारताची बाजू भक्कमअतिरेक्यांनी अल-रहमत ट्रस्टच्या क्रमांकावरही संपर्क साधल्याचे आढळून आले आहे. अल-रहमत ट्रस्ट ही जैश-ए-मोहंमदची वित्तीय शाखा आहे. पठाणकोटमधील अतिरेक्यांचे पाकिस्तानात थेट लागेबांधे असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर एनआयएने अमेरिकेकडे त्यासंबंधीचा तपशील मागविला होता. अमेरिकी अधिकाऱ्यांनी अत्यंत विस्तृत तपशील पुरविल्याने भारताची बाजू मजबूत झाली आहे. द्विपक्षीय विधि साहाय्य कराराच्या आधारे हे दस्तावेज भारतीय तपासी संस्थांना मिळाले आहेत.