शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी कंपन्या, ग्राहकांचे कल्याण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 05:04 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी एच-१बी व्हिसावर बंधने आणण्यासाठी पावले उचलली असतानाच या व्हिसामुळे अमेरिकी नागरिकांचे कल्याणच झाल्याचा निष्कर्ष एका अहवालात काढण्यात

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी एच-१बी व्हिसावर बंधने आणण्यासाठी पावले उचलली असतानाच या व्हिसामुळे अमेरिकी नागरिकांचे कल्याणच झाल्याचा निष्कर्ष एका अहवालात काढण्यात आला आहे. अमेरिकी आयटी व्यावसायिकांना मात्र या व्हिसाचा फटका बसल्याचे अभ्यासात समोर आले आहे.भारतीय आयटी व्यावसायिकांत एच-१बी व्हिसाला सर्वाधिक मागणी आहे. या व्हिसामुळे अमेरिकी कंपन्यांना विदेशी मनुष्यबळ हंगामी स्वरूपात कामावर ठेवता येते. या व्हिसाच्या संख्येवर आता अमेरिकी सरकारने मर्यादा घातली असून, व्हिसाचे नियमही कडक करण्यासाठी पावले उचलली आहेत.अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील जॉन बाउंड आणि निकोलस मोरालेस यांनी या वादग्रस्त व्हिसाचा नुकताच परिपूर्ण अभ्यास केला. कॅलिफोर्नियाच्या सॅन दिअ‍ॅगो विद्यापीठाचे गौरव खन्ना हेही या अभ्यासात सहभागी होते. विदेशी संगणक शास्त्रज्ञांचा अमेरिकी अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा त्यांनी प्रामुख्याने अभ्यास केला. १९९४ ते २00१ या कालावधीची त्यांनी अभ्यासासाठी निवड केली. या अभ्यासात असे आढळून आले की, विदेशी संगणक शास्त्रज्ञांमुळे या क्षेत्रातील नावीन्य वाढले. अमेरिकेतील आयटी कंपन्यांची नफा क्षमता वाढली. अमेरिकेच्या नागरिकांच्या कल्याणात भर पडली. आयटी उत्पादनांच्या किमती कमी झाल्या. तसेच उत्पादन १.९ टक्के ते २.५ टक्के वाढले. त्याचा थेट ग्राहकांनाच फायदा झाला. (वृत्तसंस्था)काही लोक अन्य व्यवसायाकडे वळलेअमेरिकी आयटी व्यावसायिकांवर मात्र याचा वाईट परिणाम झाल्याचे अभ्यासात दिसून आले. मोरालेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी संगणक शास्त्रज्ञांना अन्य व्यवसायाकडे वळावे लागले. त्यांच्या रोजगारावर ६.१ टक्के ते १0.८ टक्के परिणाम झाला. त्यांचे वेतनही २.६ टक्के ते ५.१ टक्क्यांनी कमी झाले.