शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी विमानांची उत्तर कोरियाच्या सीमेवर भरारी

By admin | Updated: January 11, 2016 02:54 IST

उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात केलेल्या अणुचाचणीनंतर तणाव निर्माण झाला असतानाच अमेरिकेच्या अण्वस्त्रवाहू बी-५२, एफ-१६ आणि दक्षिण कोरियाच्या एफ-१५ विमानांनी उत्तर

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात केलेल्या अणुचाचणीनंतर तणाव निर्माण झाला असतानाच अमेरिकेच्या अण्वस्त्रवाहू बी-५२, एफ-१६ आणि दक्षिण कोरियाच्या एफ-१५ विमानांनी उत्तर कोरियाच्या सीमेनजीक अगदी कमी उंचीवरून घिरट्या मारल्या.या भागात जपान, दक्षिण कोरिया अन्य काही राष्ट्रे अमेरिकेची मित्र राष्ट्रे आहेत. त्यांना उत्तर कोरियापासून धोका असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होण्यासाठीच शक्तिप्रदर्शन म्हणून आपल्या विमानांनी ही कारवाई केली, असे अ‍ॅडमिरल हॅरी बी हॅरी (अमेरिकेची एशिया पॅसिफिक कमांड) यांनी सांगितले.ते म्हणाले की, उत्तर कोरियाची अणुचाचणी ही आंतरराष्ट्रीय जबाबदारीचे उघड उल्लंघन असून त्या दृष्टीने अमेरिका आणि मित्र राष्ट्रे एकत्रित प्रयत्न करीत आहेत. या भागात स्थैर्य आणि सुरक्षितता राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.उत्तर कोरियाच्या सीमेपासून १०० कि.मी. अंतरावरील ओसान हवाई तळावरून दोन्ही देशांच्या विमानांनी उड्डाणे केली होती. त्यात या भागातील जनतेत विश्वासाची भावना निर्माण करते आणि स्थैर्य राखून शक्तिप्रदर्शन करणे हाच हेतू होता. एशिया पॅसिफिक विभागात अमेरिकेने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारी बी-५२ ही विमाने फार पूर्वीपासूनच तैनात केली असून त्यांच्या जोडीला एफ-१६ ही लढाऊ विमानेही ठेवली आहेत. त्यांच्यासोबत दक्षिण कोरियाची एफ-१५ विमानेही आहेत. उड्डाण करून ही सर्व विमाने सुरक्षित गुआम विमानतळावर उतरली. या भागात अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांचे निकटचे लष्करी सहकार्य आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे अमेरिकेचे अन्य एक लष्करी अधिकारी जन. क्युरटिस एम. स्कॅप्रोनी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आत्मसंरक्षणासाठी हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतल्याचा किम यांचा दावा सोल : हायड्रोजन बॉम्बची चाचणी आत्मसंरक्षणासाठी करण्यात आली असून अमेरिकेसोबत अणुयुद्ध रोखण्याचे ते एक पाऊल आहे. या शब्दांत उत्तर कोरियाचे नेते किम जाँग इन यांनी या चाचणीचे जोरदार समर्थन केले आहे.गेल्या आठवड्यात बुधवारी उत्तर कोरियाने कथितरीत्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. त्यावर तीव्र आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया उमटली होती. ती अणुचाचणी व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यावर किम यांनी दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.गेल्या बुधवारी करण्यात आलेली अणुचाचणी चौथी होती. या अणुचाचणीने आंतरराष्ट्रीय समुदाय संतप्त झाला, तर शेजारचा देश असलेल्या दक्षिण कोरियासोबत उत्तर कोरियाचा तणाव वाढला.