शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी चीनविरोधात मोठी अ‍ॅक्शन घेण्याच्या तयारीत ट्रम्प, बायडन यांच्या समस्या वाढविणार

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 9, 2020 13:55 IST

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस महामारीवरून चिनच जबाबदार असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. बिजिंगच्या चुकीमुळेच अमेरिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे ट्रम्प यांचे स्पष्ट मत आहे.

वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन (Joe Biden) यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत  स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अद्याप व्हाईट हाऊस सोडायला तयार नाहीत. एका वृत्तानुसार, ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये अखेरचा महिना घालवणार आहेत. कारण ज्यो बायडन हे 20 जानेवारीला शपथर घेतील आणि यानंतर ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडवावेच लागेल. अशात ट्रम्प चीनविरोधात (China) एक मोठी अ‍ॅक्शन घेण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प काहीसे असे करणार असल्याचे समजते, ज्यामुळे बायडन यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस महामारीवरून चिनच जबाबदार असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. बिजिंगच्या चुकीमुळेच अमेरिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे ट्रम्प यांचे स्पष्ट मत आहे. जॉर्जटाऊन यूनिव्हर्सिटीचे सीनिअर फेलो जेम्स ग्रीन यांच्यामते, 20 जानेवारीला अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळताच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल बघायला मिळू शकतो. अद्याप असे दिसत नाही, की ट्रम्प हे सहजपणे सर्व काही बायडन यांना सोपवतील. बायडन हे ईरान आणि चीनसंदर्भात मवाळ भूमिकेचा अवलंब करू शकतात, असेही ट्रम्प यांना वाटते. याचबरोबर सौदीचे क्राऊन प्रिंस बिन सलमान, तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोगन आणि नॉर्थ कोरियाचे तानाशाह किम जोंग उन यांच्या विरोधातही निर्णय घेतले जाऊ शकतात.

ट्रम्प घेऊ शकतात मोठा निर्णय -साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महामारी आणि शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराचे कारण सांगत ट्रम्प ट्रम्प सत्तेच्या आपल्या अखेरच्या महिन्यात, असा काही निर्णय घेऊ शकतात, की ज्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात युद्धजन्न परिस्थिती निर्माण होईल. यात चिनी कम्यूनिस्ट पक्षाशी संबंधित लोकांवर व्हिसा बंदी आणि अमेरिकन अ‍ॅथलीट्सना बिजिंग ओलंम्पिक 2022मध्ये खेळण्यावर बंदीदेखील घालण्यात येऊ शकते. याशिवाय चिनी शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या कंपन्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते. तसेच त्यांच्या खरेदी आणि विक्रीवरही निर्बंध घातले जाऊ शकतात. तज्ज्ञांच्यामते ट्रम्प यांनी अशा प्रकारचा काही निर्णय घेतल्यास बायडन  यांना सत्ता सांभाळताच चीनचा सामना करावा लागेल. तसेच त्यांची भूमिका मवाळ झाल्यास अमेरिकन जनतेत बायडन यांच्यासंदर्भात चुकीचा संदेश जाईल.

या शिवाय, काही तज्ज्ञांच्यामते, बायडन आणि ट्रम्प यांच्या चीनबरोबरच्या परराष्ट्र धोरणात फारसा विशेष फरक नाही.  निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांनी चीनबद्दलची आपली भूमिका वेळोवेळी मांडली. त्याचा त्यांना फायदाही झाला. मात्र, बायडनदेखील आपल्या सभांमधून चीनविरोधात कठोर शब्दांचा वापर करत होते. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका यूनायटेड नेशन्सवर चीनविरोधात कारवाई करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत आहे. यामुळे ट्रम्प याच बहाण्याने चीनविरोधात कारवाई करू शकतात.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS ElectionAmerica ElectionJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग