शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 07:01 IST

Protest In United State News: अमेरिकेत स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधातील आंदोलनांनी देश ढवळून निघाला. देशातील १२ राज्यांतील २५ शहरांत निदर्शने सुरू आहेत.

ऑस्टिन (अमेरिका) - अमेरिकेत स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधातील आंदोलनांनी देश ढवळून निघाला. देशातील १२ राज्यांतील २५ शहरांत निदर्शने सुरू आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी नॅशनल गार्ड सैन्य व मरीन तैनात केल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी अधिक आक्रमकपणे निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारबंदीनंतर हजारो लोकांची धरपकड करण्यात येत आहे. 

सिएटल, ऑस्टिनपासून शिकागो आणि वॉशिंग्टनपर्यंत मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट एजन्सीविरुद्ध हातात फलक घेऊन विविध मार्गांवर व कार्यालयांबाहेर वाहतूक रोखून धरली. अनेक ठिकाणी आंदोलन शांततेत होत असताना त्यांना पोलिसांच्या बडग्याचा सामना करावा लागला. काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी रसायनांचा वापर करण्यात आला. आंदोलक काही दिवसांत यापेक्षा मोठ्या निदर्शनांची योजना आखत असल्याने आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

...अन्यथा लॉस एंजिलिस जळाले असते : ट्रम्पनिदर्शनांनी ढवळून निघालेल्या लॉस एंजिलिसमध्ये मी सैन्य पाठवले म्हणून बरे झाले. अन्यथा लॉस एंजिलिस जळाले असते, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

स्टारने अमेरिका सोडलीलाखो फॉलोअर्स असलेला जगातील लोकप्रिय टिकटॉकस्टार खाबी लेने त्याच्या व्हिसाची मुदत संपल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेतून निघून गेला. 

कुठे काय घडले?सॅनफ्रान्सिस्को : इमारतींची तोडफोड, वाहने, पोलिस वाहनांचे नुकसान.सिएटल : सर्वांना मुक्त करा, आयसीई रद्द करा, हद्दपारी करू नका, असे फलक हातात धरत लोकांनी आंदोलन केले. न्यूयॉर्क शहर : पोलिस बंदोबस्तात मिरवणूक काढण्यात आली. शिकागो : निदर्शकांची संख्या एक हजारपर्यंत वाढली होती. बोस्टन : शेकडो लोकांनी आंदोलन केले.  डेन्व्हर, सँटा ॲना, ऑस्टिन, डल्लास व  वॉशिंग्टनमध्येही आंदोलन केले गेले.

टॅग्स :United StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय