शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

१२८ खोल्या, २० एकर जागा, १६ कोटी डॉलर्स किंमत; पाहा कसं असेल ट्रम्प यांचं नवं घर

By जयदीप दाभोळकर | Updated: January 21, 2021 14:04 IST

निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प यांना सोडावं लागलं व्हाईट हाऊस

ठळक मुद्देनिवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प यांना सोडावं लागलं व्हाईट हाऊस१९८५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी खरेदी केलं होतं हे घर

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावं लागलं. ट्रम्प हे आता फ्लोरिडामधील पाम बीचनजीक असलेल्या आपल्या मार-ए-लागो इस्टेटला आपलं निवासस्थान बनवणार आहेत. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार व्हाईट हाऊसमधून ट्रम्प यांच्या अखेरच्या कामाकाजाच्या दिवशी निघालेले ट्रक हे त्यांच्या मार-ए-लागो या निवासस्थानी पोहोचल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातही मार-ए-लागो या ठिकाणी आपला बराचसा वेळ घालवला आहे. याला ट्रम्प यांचं विंटर हाऊस म्हणूनही संबोधलं जायचं. ७४ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी १९८५ मध्ये एक कोटी डॉलर्सला हे घर खरेदी केलं होतं. तसंच त्यानंतर त्यांनी ते एका खासगी क्लबमध्ये बदललं. गेल्या चार वर्षांपासून हे त्यांचं विंटर हाऊस म्हणून ओळखलं जात होतं. हे घर १९२७ मध्ये उभारण्यात आलं होतं. फोर्ब्सच्या माहितीनुसार रिनोवेशन आणि हे घर ज्या ठिकाणी आहे त्यानुसार मार-ए लागोची किंमत जवळपास १६ कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास ११६६.७३ कोटी रूपये इतकी आहे.जवळपास २० एकरमध्ये परसलेल्या या घरात १२८ खोल्या आहेत. तसंच घरातून मनमोहक असा अटलांटिक महासागराचं दृश्यही दिसतं. दरम्यान, क्लबचं सदस्यत्व घेणाऱ्या लोकांसाठी ही जागा खुली राहणार आहे. यामध्ये २० हजार चौरस फुटांची बॉलरूम, ५ क्ले टेनिस कोर्ट आणि एक वॉटरफ्रन्ट पूल सामिल आहे. या ठिकाणी ट्रम्प यांचे प्रायव्हेट कॉर्टर्सदेखील आहेत. मार-ए-लोगो फ्लोरिडातील दुसरं मोठं मेन्शन समजलं जातं.दरम्यान, ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदावर नसले तरी त्यांना सिक्युरिटी आणि ट्रान्सपोर्टच्या खर्चासाठी १० लाख डॉलर्स देण्यात येणार आहे. तर याव्यतिरिक्त त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना पाच लाख डॉलर्स देण्यात येतील. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाUS ElectionAmerica ElectionJoe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिसMelania Trumpमेलेनिया ट्रम्प