शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन लढाऊ विमानांनी केली कोरियावरून उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:17 IST

उत्तर कोरियाने शुक्रवारी केलेली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी आणि त्याआधी केलेली अग्णिबाणाची चाचणी याला उत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या दोन बी -१ बी लढाऊ विमानांनी कोरियन व्दिपकल्पावरुन उड्डाणे केली.

वॉशिंग्टन / स्योल : उत्तर कोरियाने शुक्रवारी केलेली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी आणि त्याआधी केलेली अग्णिबाणाची चाचणी याला उत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या दोन बी -१ बी लढाऊ विमानांनी कोरियन व्दिपकल्पावरुन उड्डाणे केली.अमेरिकेच्या विमानांनी दहा तासांच्या व्दिपक्षीय मोहिमेत भाग घेताना हा सराव केला. उत्तर कोरियाने शुक्रवारी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर किम जोंग उन यांनी म्हटले होते की, आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही लक्ष्याचा वेध घेऊ शकतो. पॅसिफिक एअर फोर्सेज कमांडर जनरल टैरेंस ओ शॉनेसी यांनी म्हटले आहे की, उत्तर कोरिया हा क्षेत्रीय स्थिरतेवरील धोका बनला आहे. जर गरज पडली तर आम्ही जलद, घातक आणि प्रचंड बळाने आपल्या वेळेनुसार आणि स्थानावरुन उत्तर देण्यास तयार आहोत.उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत तज्ज्ञांचे असे मत आहे की, ४ जुलै रोजी केलेल्या चाचणीपेक्षा हे क्षेपणास्त्र अधिक शक्तिशाली आहे. दहा हजार किमीच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता यात आहे. म्हणजेच अमेरिकेतील प्रमुख शहरांपर्यंत पोहचण्याची याची क्षमता आहे. उत्तर कोरियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की, क्षेपणास्त्राची चाचणी अमेरिकेसाठी इशारा आहे. उत्तर कोरियाविरुद्धचे प्रतिबंध आणि आमच्या देशाविरुद्ध दबाव वाढविण्याची मोहिम अमेरिका राबवत आहे. (वृत्तसंस्था)