शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने प्रसिद्ध केला कुलभूषण जाधवांच्या कबुलीजबाबाचा कथित व्हिडिओ

By admin | Updated: June 22, 2017 21:04 IST

हेरगिरीच्या कथित आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ पाकिस्तानकडून प्रसारित करण्यात

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 22 -   हेरगिरीच्या कथित आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ पाकिस्तानकडून प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव हे आपला कबुलीजबाब देताना दिसत असून, जाधव यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांकडे माफीनामा मागितल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. 
पाकिस्तानी लष्कराकडून हा कथित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.  हा व्हिडिओ यावर्षी  एप्रिल महिन्यात चित्रित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव हे 2005 आणि 2006 साली आपण कराचीचा दौरा केल्याचे कबूल करताना दिसत आहेत. तसेच 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारतीय गुप्तहेर यंत्रणांनी आपल्याला पाकिस्तानमध्ये हेरगिरी आणि कारवाया करण्याची जबाबदारी दिल्याचे सांगत आहेत.  पाकिस्तानमधील आयएसपीआरचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आज फेसबुकवरून जाधव यांनी केलेल्या दया याचिकेची माहिती दिली. तसेच त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या कबुलीनाम्याचा व्हिडिओसुद्धा प्रसारित केला.  
मे महिन्यामध्ये हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपला निकाल सुनावताना हा निर्णय दिला होता. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केले होते.