शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘अल कायदा’ आता सिरियाला करणार लक्ष्य

By admin | Updated: May 17, 2016 04:43 IST

अल कायदाच्या पाकिस्तानातील वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या गटाचे भवितव्य सिरियामध्येच असल्याचा निर्णय घेतला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएने दशकभर ड्रोनने केलेल्या हल्ल्यांमुळे फारच दुबळ्या बनलेल्या अल कायदाच्या पाकिस्तानातील वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या गटाचे भवितव्य सिरियामध्येच असल्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुप्तपणे डझनपेक्षा जास्त अनुभवी लोक सिरियात पाठविले असल्याचे वरिष्ठ अमेरिकन आणि युरोपियन गुप्तचरांनी तसेच दहशतवादविरोधी अधिकाऱ्यांनी सांगितले. अल कायदाच्या वरिष्ठ जिहादींच्या हालचालींवरून या दहशतवादी संघटनेसाठी सीरियाचे महत्त्व वाढत चालल्याचे दिसते. त्यामुळे या गटाचा इस्लामिक स्टेटशी (आयएस) असलेला रक्तरंजित संघर्ष वाढू शकतो, असे पाश्चिमात्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिरियामध्ये पर्यायी मुख्यालय स्थापन्याची प्रक्रिया सुरू करण्यास हस्तकांना तसेच इस्लामिक स्टेटला शह देण्यासाठी अल कायदाच्या सिरियाशी संलग्न असलेल्या नुसरा फ्रंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे. आयएसपासून २०१३मध्ये नुसरा फ्रंट वेगळी झाली. पायाभूत म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत स्वायत्त राज्य (एमिरेट) स्थापन करण्यास आतापर्यंत अल कायदा आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या गटांचा विरोध होता; त्यामुळे आताचा झालेला बदल महत्त्वाचा समजला जात आहे.