शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’च्या कब्जातील तेल क्षेत्रावर हवाई हल्ले

By admin | Updated: September 26, 2014 05:06 IST

हवाई हल्ले होण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी रक्का येथील तुरुंगातील अनेक बंदीवानांची सुटका केली.

बैरुत : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील आणि या संघटनेच्या दृष्टीने सर्वार्थाने पाठबळाचे केंद्र असलेल्या सिरियातील तेल प्रकल्पावर अचूक निशाणा साधत अमेरिकेने बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे हवाई केला. यात २० जण ठार झाले. आणखी हवाई हल्ले होण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी रक्का येथील तुरुंगातील अनेक बंदीवानांची सुटका केली.सिरिया आणि इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी ठाम निर्धार केला असून हा निर्धार तडीस नेण्यासाठी या संघटनेच्या अड्ड्यांना लक्ष्य करीत हवाई हल्ले चढविण्यात येत आहेत.इस्लामिक स्टेट संघटनेने या वर्षाच्या सुरुवातीला सिरियातील सर्वात मोठ्या तेल क्षेत्रावर कब्जा मिळविला होता. तेलाची तस्करी करून ते काळ्या बाजारात विकून ही संघटना आपल्या कारवायांसाठी आर्थिक पाठबळ उभे करीत. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यात मयादीन शहराभोवतालचे चार तेल प्रकल्प आणि तीन तेल क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले, असे ब्रिटनस्थित सिरियन मानवी हक्क संघटना आणि दोन स्थानिक मानवी हक्क संघटनेने सांगितले. तसेच दहशतवाद्यांशी निष्ठावंत असलेल्या तिसऱ्या संघटनेनेही हवाई हल्ल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. ब्रिटनस्थित सिरिया आॅर्ब्झव्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या माहितीनुसार या हल्ल्यात १४ अतिरेकी मारले गेले, तसेच तेल प्रकल्पालगतच्या वस्तीतील ५ जण ठार झाले. आणखी हल्ले होण्याच्या भीतीने या अतिरेक्यांनी ईशान्य सिरियातील स्वयंघोषित रक्क या राजधानीतील तुरुंगात डांबलेल्या १५० लोकांची सुटका केली आहे, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)