शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सहलीला गेल्यानंतर भरपूर सेल्फी काढा, आनंदात रहा..!

By admin | Updated: June 13, 2016 17:26 IST

जर तुम्हाला पर्यटन स्थळाचे फोटो काढत बसल्यास सहलीची मजा घेता येणार नाही किंवा तुमचे अनुभव कॅमेरात टिपतच बसलो तर त्यांचा अधिक आनंद लुटता येणार नाही असे वाटत असेल तर पुन्हा विचार करा !

ऑनलाइन लोकमत

कॅलिफोर्निया, दि. १३ : जर तुम्हाला पर्यटन स्थळाचे फोटो काढत बसल्यास सहलीची मजा घेता येणार नाही किंवा तुमचे अनुभव कॅमेरात टिपतच बसलो तर त्यांचा अधिक आनंद लुटता येणार नाही असे वाटत असेल तर पुन्हा विचार करा ! कारण नुकत्याच केलेल्या नवीन संशोधनाद्वारे जे लोक आपल्या अनुभवांचे तसेच तसेच आपल्या महत्त्वपूर्ण घटनांचे क्षण फोटोत टिपतात ते त्यांचा जास्त आनंद घेतात हे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. 

युनिवर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्निया, येले युनिवर्सिटी आणि युनिवर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामधील मानसशास्त्रज्ञांनी संयुक्तपणे अशाप्रकारातील पहिलेच संशोधन केले आहे.छायाचित्रण कला आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी या मानसशास्त्रज्ञांनी दोन हजारांहून जास्त लोकांच्या जवळपास नऊ चाचण्या घेतल्या. त्यानंतर अधिक माहितीसाठी त्यांचे सर्वेक्षण घेण्यात आले. या सर्वेक्षणात ज्यांनी आपल्या अनुभवांचे छायाचित्रण केले आहे अशा जवळपास सर्वांनीच छायाचित्र न काढलेल्यांपेक्षा जास्त आनंद उपभोगल्याचे समोर आले आहे.या संशोधनात सहभागी व्यक्तींना एक संग्रहालयातील प्रदर्शनाचा स्वमार्गदर्शक दौरा घेण्यास सांगितले आणि त्यांच्या डोळा हालचाली टिपण्यासाठी एक चष्मा परिधान करायला दिला. संशोधकांना प्रदर्शनात छायाचित्र काढलेल्या व्यक्ती या प्रदर्शन केवळ बघणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त आनंदी दिसून आल्या. अशा व्यक्ती या अनुभवांत किंवा एखाद्या घटनेत जास्त गुंततात असेही संशोधकांचे म्हणणे आहे. तर मोठे कॅमेरे आणि त्याची साधने घेऊन फोटो काढणे हे लोकांना गैरसोयीचे वाटत असल्याचे तसेच मोबाईलने छायाचित्र काढणे सोपे जात असल्याचेही समोर आले आहे.