शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१३२ विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर पेशावरमधील 'थरार' संपला

By admin | Updated: December 16, 2014 18:56 IST

पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर ६ ते ७ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३२ निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर ७ तासांनंतर हा थरार संपुष्टात आला.

ऑनलाइन लोकमत

पेशावर, दि. १६ - माणुसकीला काळिमा फासणा-या पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांनी आता लहान मुलांनाही सोडले नसून पेशावरमधल्या लष्करी शाळेत आत्मघातकी हल्ला केला आहे. शेकडो मुलं शिकत असलेल्या शाळेमध्ये सुमारे सात दहशतवादी घुसले असून आत्तापर्यंत त्यांनी १३२ निष्पाप विद्यार्थ्यांना ठार केले असल्याचे लष्करी अधिका-यांनी सांगितले. त्यात एक शिक्षक व जवानाचाही समावेश आहे. सिडनीतली घटना ताजी असतानाच इतका मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानात घडला असल्यामुळे इस्लामी दहशतवाद्यांच्या वाढलेल्या धोक्याची कल्पना येत आहे.
मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांसह लष्करी शाळेवर आत्मघातकी हल्ला चढवला. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली असून या परीसरामध्ये केवळ बंदुकांचेच नाही तर बाँबस्फोटांचेही आवाज ऐकायला येत आहेत.
तहरीक- ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने या दहशतवादी कृत्चेयाची जबाबदारी घेतली असून पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सुमारे १५०० विद्यार्थी व शिक्षकांना  ओलीस ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलातील जवानांनी शाळेला चारही बाजूंनी वेढा घातला असून दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक सुरू होती.
या हल्ल्यात जवळपास ४० विद्यार्थी जखमी झाले असून सुमारे १५ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामधून जीव बचावलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार शेकडो विद्यार्थ्यांना ऑडिटोरियममध्ये बसवण्यात आले आहे. त्यांचा जीवही धोक्यात आहे. दहशतवादी शाळेच्या आवारात बाँबस्फोटही करत असून विद्यार्थ्यांच्या नक्की स्थितीचा अंदाज येत नसल्याचे समजते. पाकिस्तानचे सुरक्षा दलाचे जवान विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी निकराचे प्रयत्न करत आहेत.