शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आफ्रिकेत तीन महिन्यांत दीड कोटी चाचण्यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 20:38 IST

येत्या तीन महिन्यांत आफ्रिकेत किमान दीड कोटी कोरोना चाचण्या घेण्याची गरज आहे.  हे अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी ते प्रय} करताहेत.

ठळक मुद्देयुरोपात सध्या दहा लाख लोकसंख्येसाठी सुमारे चार हजार अतिदक्षता विभागातील बेड्स आहेत. आफिक्रन देशांत हेच प्रमाण आहे, दहा लाख लोकांसाठी केवळ चार बेड्स!

लोकमत न्यूज नेटवर्कजगभरात कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगानं होत असताना आफ्रिकन देशांमध्ये मात्र त्याच्या विस्ताराचा वेग तितकासा अधिक नाही. आफ्रिका खंडात तुलनेनं कोरोनाचे कमी रुग्ण दिसताहेत. काय कारण असावं त्याचं? खरंच कोरोनानं अजून तिथे शिरकाव केलेला नाही? आफ्रिकेतील लोकांची कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती खरंच इतकी बळकट आहे? कि या देशांनी कोरोनाविरुद्धची अतिशय प्रत्ययकारी अशी व्यवस्था उभारली आहे?खरंतर यापैकी कोणत्याही प्रo्नाचं उत्तर नाही असंच आहे. खरंतर आफ्रिकन देशांमध्ये सध्या अतिशय भयावह अशी स्थिती आहे. तिथे कोरोनाचे  रुग्ण अतिशय कमी दिसतात, कारण तिथे अजून हजारो, लाखो लोकांचं टेस्टिंगच झालेलं नाही. याचं कारण बर्‍याच ठिकाणी ती सुविधाच उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेनंही त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे, आफ्रिकन लोकांना लवकरात लवकर सार्‍या सुविधा मिळाल्या नाहीत, तर तिथल्या बळींची संख्या खूप मोठी असेल. जागतिक आरोग्य संघटनेनं त्याचा लेखाजोखाच मांडला आहे. युरोपमध्ये तर सध्या कोरोनानं हाहाकार माजवला आहे. युरोपात सध्या दहा लाख लोकसंख्येसाठी सुमारे चार हजार अतिदक्षता विभागातील बेड्स आहेत. आफिक्रन देशांत हेच प्रमाण आहे, दहा लाख लोकांसाठी केवळ चार बेड्स! कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जगात सर्वात कमी सोयी आणि साधनं आफ्रिकेत आहेत. अशावेळी त्यांचं काय होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे संपूर्ण जगानं आफ्रिकेकडे अधिक लक्ष पुरवावं आणि त्यांना तातडीनं मदत पुरवावी असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. यासंदर्भात आफ्रिकन देशही एकत्र आले असून येत्या काही दिवसांत दहा लक्ष कोरोना चाचण्या घेण्यासाठीची सुविधा आम्ही निर्माण करू असं आफ्रिकन देशांच्या आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात घेण्यात आलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत आफ्रिकन केंद्राचे संचालक जॉन नेकेनसोंग यांनी सांगितलं की, प्रत्यक्षातले कोरोनाचे रुग्ण आणि चाचण्यांची कमतरता यातील दरी भरून काढण्याचा प्रय} आम्ही करीत आहोत. त्यासाठी चाचण्यांची संख्या आम्ह्ी वाढवणार आहोत. येत्या तीन महिन्यांत आफ्रिकेत किमान दीड कोटी कोरोना चाचण्या घेण्याची गरज आहे. तीन महिन्यांत दीड कोटी चाचण्या घेण्याचं अशक्यप्राय आव्हान आफ्रिकन देशांपुढे आहे, पण सध्या तरी मिळेल तिथून आणि मिळेल त्या मार्गानं ही दरी भरी काढण्याचा प्रय} ते करताहेत. आफ्रिकन देशांमध्ये रुग्णांची संख्याच केवळ वाढत नाहीए, त्याशिवाय इतरही मोठी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे. आरोग्य साधनं, कर्मचारी, नर्सेस नाहीत. लोकांमध्ये तेवढी जागरुकता नाही. त्यापेक्षाही मोठा प्रo्न आहे, तो म्हणजे भुकेचा. कुठल्याही रोगापेक्षा आधी पोटाचा प्रo्न त्यांना महत्त्वाचा वाटतो. आफ्रिकन देशांमध्ये त्यातल्या त्यात सध्या ‘विकसित’ देश म्हणजे दक्षिण आफ्रिका. पण तेही आतापर्यत केवळ ऐंशी हजार चाचण्या घेऊ शकले आहेत. आफ्रिकन देशांना लवकरात लवकर वैद्यकीय उपकरणं आणि टेस्टिंग किट्स मिळाले नाहीत, तर तिथे महाभयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते.