शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अफगाणिस्तानची तालिबानसमोर शरणागती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:43 IST

अफागण सरकारनं  तालिबानसमोर जवळपास गुडघे टेकले आहेत. त्यांनी तालिबानला आवाहन केलं आहे, कोरोनानं असंही लोकं मरताहेत, निदान या काळात तरी तुम्ही हल्ले करू नका

ठळक मुद्देआता तरी हल्ले थांबवा- अफगाणिस्तानची तालिबानसमोर शरणागती!

लोकमत न्यूज नेटवर्कअफगाणिस्तानवर सध्या चारही बाजूंनी संकटं कोसळताहेत. ‘कोविड-19’चे रुग्ण झपाट्याने वाढताहेत. मृतांची संख्याही वाढतीच आहे. त्यांच्यासाठी चिंतेची बाब म्हणजे अपुर्‍या आरोग्यसुविधांमुळे अनेक लोकांची तपासणीच झालेली नाही किंवा होऊ शकलेली नाही. त्यामुळे रुग्णांचा आकडे नेमका किती, हेच स्पष्ट होऊ शकलेले नाही. अफगाणिस्तानातील आरोग्य सेवेचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, ‘अज्ञानातल्या सुखाचा’ अनुभव सध्या आम्ही घेतो आहोत. आम्हाला दिसतंय, कळतंय, आमच्याकडे कोरोनाच्या पेशंट्सची संख्या किती असू शकेल ते! त्यांची चाचणी झाली नाही, एवढंच. पण काबूलच्या गल्लीबोळात कोरोनाचा हजारो रुग्ण असतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. पोहोचणार तरी कसं? आत्ता आहे तीच व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. त्यात पेशंट्सची संख्या आणखी वाढली, तर पहिला बळी आरोग्य व्यवस्था आणि डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सहायक यांचा जाणार नाही. डॉक्टरच राहिले नाही, तर काय हाहाकार उडेल याचं चित्र आम्हाला डोळ्यांसमोर दिसतंय. तरीही आम्ही प्रय}ांची पराकाष्ठा करतोय. ही महामारी आणखी वाढणार नाही यासाठी दुवा मागतोय. त्यात लोकं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. लॉकआऊटच्या काळातही लोकांनी सोशल डिस्टन्सिंगची पार ऐसी की तैसी करून ठेवली आहे. यावर अफगाणिस्तानचे आरोग्यमंत्री फिरोजुद्दीन फिरोज यांनीही हात टेकले आहेत. ते म्हणतात, लोकांनी जर गांभीर्यानं विचार केला नाही, आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही, तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये जगात आमचा देश अग्रस्थानी असू शकेल!अफगाणिस्तानसमोरचं दुसरं संकट तर त्याहूनही मोठं आहे. एकीकडे देश कोरोनाच्या संकटात कसाबसा तग धरून राहण्याचा प्रय} करतोय, तर दुसरीकडे तालिबाननं आपल्या अतिरेकी कारवाया, हल्ल्यांमध्ये कुठलीही कमी केलेली नाही. दिवसेंदिवस हे हल्ले वाढताहेत. त्यामुळे प्रशासनासमोरची काळजी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आरोग्यव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, वाढत्या रुग्णसंख्येची काळजी करावी, कि तालिबानचे हल्ले थांबवावेत, या त्रिचंडी प्राणायामत ते अक्षरश: हतबल झाले आहेत. त्यामुळे अफागण सरकारनं  तालिबानसमोर जवळपास गुडघे टेकले आहेत. त्यांनी तालिबानला आवाहन केलं आहे, कोरोनानं असंही लोकं मरताहेत, निदान या काळात तरी तुम्ही हल्ले करू नका, एकतर्फी सिझफायर करा. कोरोना ना दुष्मनाला ओळखतो, ना दोस्ताला. सगळ्यांचा तो प्राण घेतो. त्यामुळे आता तरी हल्ले थांबवा आणि आपण दोघं मिळून कारोनाविरुद्ध लढू, असं आवाहनही त्यांनी तालिबानला केलंय. तालिबान ते किती गंभीरपणे घेईल, हे माहीत नाही, पण त्यामुळे अफगाणी लोकांची मात्र पाचावर धारण बसली आहे हे निश्चित. इकडे आड, तिकडे विहीर  अशी त्यांची स्थिती झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या