शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अफगाण कॉरिडॉरमुळे ड्रॅगनचे पित्त खवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 00:34 IST

भारत आणि अफगाणिस्तानदरम्यानच्या समर्पित कार्गो एअर कॉरिडॉरमुळे चिनी माध्यमांचे पित्त खवळले आहे.

बीजिंग : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यानच्या समर्पित कार्गो एअर कॉरिडॉरमुळे चिनी माध्यमांचे पित्त खवळले आहे. पाकव्याप्त काश्मिरातून जाणाऱ्या चीनच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक कॉरिडॉरला प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न असून, यातून भारताच्या भू-राजकीय विचारांतील अडेलतट्टूपणा प्रतिबिंबित होता, असे चीनचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानने गेल्या आठवड्यात समर्पित हवाई कॉरिडॉर सुरू केला होता. या कॉरिडॉरमुळे चोहीबाजूने जमीन असलेल्या अफगाणिस्तानला भारतीय बाजारपेठेत व्यापक प्रवेशाची संधी मिळणार आहे. भारत पर्यायी आणि विश्वसनीय दळणवळण मार्ग तयार करण्यासाठी अफगाणिस्तानसोबत काम करीत आहे. भारत, अफगाणिस्तान आणि इराणदरम्यान आधीच सुरू झालेल्या आणि प्रस्तावित मार्गांमुळे भारत अफगाणिस्तान आणि इतर मध्य आशियाई देशांसोबत व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी पाकिस्तानकडे दुर्लक्ष करील काय, असा प्रश्न उपस्थित होतो, असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला भारताने दर्शविलेल्या विरोधाचा संदर्भ देताना या लेखात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या सर्व दळणवळण प्रयत्नांमुळे प्रादेशिक विकासात अधिक सक्रियतेने सहभागी होण्याची भारताची इच्छा दिसून येते; मात्र त्याचबरोबर यातून त्याच्या भू-राजकीय विचारातील अडेलतट्टूपणाही दिसतो, असे या लेखात नमूद केले आहे. भारताने नेहमीच चीनच्या ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ला विरोध केला आहे. त्यामुळे स्वत:चे संपर्क जाळे बनविण्याचे त्याचे प्रयत्न चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला शह देण्याची एक व्यूहरचना दिसते, असेही या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)