शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नकाराधिकार वापरला तरी अझहरवर होणार कारवाई - अमेरिका

By admin | Updated: April 4, 2017 17:05 IST

कुठल्याही देशाने नकाराधिकार वापरून कितीही विरोध केला तरी मसूद अझहरवर कारवाई होणारच असा रोखठोक इशारा अमेरिकेने

ऑनलाइन लोकमत 
संयुक्त राष्ट्रे, दि. 4 - कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नात चीन नकाराधिकाराचा वापर करून सातत्याने खोडा घालत आहे. पण आता कुठल्याही देशाने नकाराधिकार वापरून कितीही विरोध केला तरी मसूद अझहरवर कारवाई होणारच असा रोखठोक इशारा अमेरिकेने दिला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत, पण चीनकडून नकाराधिकाराचा वापर करून त्यात वारंवार अडथळा आणण्यात येत आहे. अशा वेळी अमेरिकेचे हे वक्तव्य आंतराष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. 
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी पदभार सांभाळल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काही मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या ज्या गोष्टींवर चर्चा झाली त्यात बंदी घालण्यात आलेल्या आणि यादीत असलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. निक्की यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंदी घाललेल्या दहशतवाद्यांच्या यादीबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी सुरक्षा परिषदेतील काही स्थायी सदस्य नकाराधिकाराचा वापर करून दहशतवाद्यांविरोधातील कारवाईच्या प्रयत्नांना कसे हाणून पाडत आहेत, याचा उल्लेख निकी यांनी चीनचे नाव न घेता केला.  अशा प्रश्नी नकाराधिकाराचा वापर करणाऱ्यांबाबत आम्ही निश्चितपणे पावले उचलणार आहोत. अशा दहशतवाद्यांवर कारवाई करण्यापासून अमेरिकेला कुणीही रोखू शकत नाही. असेही त्यांनी सांगितले.