शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताने लाभली अलौकिक प्रतिभा!

By admin | Updated: May 17, 2015 02:14 IST

सहा वर्षांपूर्वीचा अपघात होण्यापूर्वी तिला कवितेचा गंध नव्हता की चित्रकलेत गती नव्हती. गणितासारख्या क्लिष्ट विषयाशी तर तिचा दुरान्वयानेही संबंध नव्हता.

न्यूयॉर्क : सहा वर्षांपूर्वीचा अपघात होण्यापूर्वी तिला कवितेचा गंध नव्हता की चित्रकलेत गती नव्हती. गणितासारख्या क्लिष्ट विषयाशी तर तिचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्या अपघाताने मेंदूला झालेल्या जबर दुखापतीमुळे पूर्वायुष्याच्या तिच्या स्मृतीही पूर्णपणे पुसल्या गेल्या. पण मेंदूच्या या दुखापतीमुळेच आता ती एक अलौकिक प्रतिभावंत बनली आहे. ती आता आवाज ‘पाहू’ शकते व ‘रंग’ ऐकू शकते. ती आता एक सिद्धहस्त कवयित्री झाली असून, तिचे घर तिने काढलेल्या सुंदर चित्रांचे जणू कलादालन बनले आहे!वैद्यकशास्त्रालाही थक्क करणारी ही कहाणी आहे लीघ एर्सेग या ४७ वर्षांच्या महिलेची. कोलोराडो राज्याच्या वायव्य भागातील मोफ्फॅट काउंटीमधील मेबेल वसाहतीमध्ये लीघचा पूर्वी पशुपालनाचा ‘रँच’ होता व तिचे व्यक्तिमत्त्व ‘टॉमबॉय’ला साजेसे होते. मात्र २००९ मधील अपघाताने तिचे व्यक्तिमत्त्व व आयुष्यही आमूलाग्र बदलले. लीघ तोल जाऊन रँचमधील एका खोल घळीत पडली आणि त्या दुखापतीने तिच्या मेंदू आणि मज्जारज्जूसह एकूण चेतासंस्थेमध्ये एकाच वेळी बरे आणि वाईट असे बदल झाले. वाईट अशासाठी की मेंदूच्या या आघाताने लीघ गतआयुष्याच्या स्मृती पार गमावून बसली. ही विस्मृती एवढी पराकोटीची आहे की तिला स्वत:च्या आईचे नाव आठवत नाही की ती तिला ओळखतही नाही! चांगले असे की, ज्या संज्ञानी क्षमता (कॉग्नेटिव्ह अ‍ॅबिलिटिज) तिच्यात जन्मजात नव्हत्या, त्या उत्पन्न झाल्या.लीघची ही कहाणी ‘एबीसी’ चित्रवाहिनीने वैद्यकविश्वातील एक अघटित म्हणून जगापुढे आणली. लीघच्या सद्य:स्थितीचे तज्ज्ञांनी जे निदान केले, त्यातून ही केस वैद्यकशास्त्रात एकमेवाद्वितीय मानली जात आहे.