शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

द्विधा मन:स्थितीतील मतदार निर्णायक

By admin | Updated: October 25, 2016 04:50 IST

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीला दोन आठवडे शिल्लक असताना डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड

- गायती सिंग,  नवी दिल्लीअमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीला दोन आठवडे शिल्लक असताना डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा हिलरी या ७ अंकांनी आघाडीवर असल्याचे चित्र आहे. असे मानले जात आहे की, ९० टक्के मतदारांनी आपला निर्णय ठरविला आहे, तर ५ ते ८ टक्के मतदारांनी अद्याप क्लिंटन की ट्रम्प याबाबत निर्णय घेतलेला नाही. २९ जुलैच्या एका आकडेवारीनुसार हिलरी क्लिंटन यांना ४४.३ टक्के लोकांचे समर्थन होते, तर डेमोक्रॅटिकच्या संमेलनानंतर यात आणखी भर पडली आहे. अनिश्चित मतदारांमध्ये त्या नागरिकांचा समावेश आहे ज्यांनी कुणाला मतदान करायचे याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. फिलाडेल्फियात एका मतदाराने यावर सूचक भाष्य केले होते. यापैकी एका उमेदवाराची निवड करणे म्हणजे हार्ट अटॅक की स्ट्रोक? यापैकी एकाची निवड केल्यासारखे आहे, असा तिरकस सवालही या मतदाराने केला होता. अर्थात द्विधा मन:स्थितीतील मतदार प्रत्येक निवडणुकीत असतात. पण यंदा चित्र थोडे वेगळे आहे. कारण, अनेक मतदार दोन्ही उमेदवारांबाबत प्रतिकूल आहेत. या निवडणुकीत तरुण मतदारांची संख्या अधिक आहे.जुलैमधील सर्वेक्षणानुसार, १८ ते २९ वयोगटातील ६० टक्के मतदार हिलरींसाठी प्रतिकूल आहेत, तर यातील ३१ टक्के मतदार अनुकूल आहेत. सीबीएस पोलनुसार, ज्यांचे मत अद्याप अनिश्चित आहे त्यांचे या दोन्ही उमेदवारांबाबत सकारात्मक मत नाही. तरीही यातील ५ टक्के नागरिक हे क्लिंटन यांच्याबाबत थोडे मवाळ आहेत, तर ३ टक्के नागरिक ट्रम्प यांच्याकडून झुकलेले दिसतात.