शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आइस्क्रीमच्या 26 हजार कांड्यांनी साकारली भव्य रांगोळी; भारतीय महिला, तिच्या मुलीने केला आगळा विक्रम

By ओमकार संकपाळ | Updated: January 28, 2023 06:14 IST

एक भारतीय महिला व तिच्या मुलीने सिंगापूरमध्ये आइस्क्रीमच्या २६ हजार कांड्यांच्या साहाय्याने सहा मीटर लांब व सहा मीटर रुंदीच्या आकाराची अप्रतिम रांगोळी साकारली.

सिंगापूर :

एक भारतीय महिला व तिच्या मुलीने सिंगापूरमध्ये आइस्क्रीमच्या २६ हजार कांड्यांच्या साहाय्याने सहा मीटर लांब व सहा मीटर रुंदीच्या आकाराची अप्रतिम रांगोळी साकारली. त्यामध्ये प्रख्यात तमिळ कवींचे चित्रण करण्यात आले आहे. या दोघींनी इतकी आगळीवेगळी रांगोळी काढून केलेल्या विक्रमाची सिंगापूर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

सुधा रवी यांनी २०१६ साली सिंगापूरमध्ये ३२०० चौरस फूट आकाराची भव्य रांगोळी काढली होती. त्याची नोंद सिंगापूर बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली होती. 

- पोंगल सणानिमित्त कलामंजिरी, लिटल इंडिया शॉपकीपर्स अँड हेरिटेज असोसिएशन (लिशा) या संस्थांनी लिटल इंडिया भागामध्ये गेल्या आठवड्यात आयोजिलेल्या सांस्कृतिक महोत्सवात सुधा रवी व त्यांची मुलगी रक्षिता यांनी आइस्क्रीमच्या हजारो कांड्यांनी साकारलेली रांगोळी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली होती. - ही रांगोळी काढण्याचे काम महिनाभर सुरू होते. त्यामध्ये प्रख्यात तमिळ कवी तिरुवल्लूवर, अववैय्यार, भारतीयार, भारतीदासन या कवींचे चित्रण केले आहे.

1. आइस्क्रीमच्या कांड्यांपासून साकारलेली रांगोळी खूप सुंदर होती, असे सिंगापूरमध्ये खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या रजनी अशोकन यांनी सांगितले.2. पोंगलनिमित्त तमिळी कवींच्या कविता व गाणी यांचा कार्यक्रम तसेच व्हायोलिन, तबलावादन तसेच नृत्य सादर करून कलाकारांनी लोकांना मंत्रमुग्ध केले.

तमिळी संस्कृतीच्या प्रसारासाठी काढली रांगोळी- सुधा रवी या रांगोळी साकारण्यात अतिशय तरबेज आहेत. तमिळ संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्यांनी अनेक रांगोळ्या याआधी चितारल्या आहेत. त्यांच्या रांगोळ्यांचे सिंगापूरमधील अन्य वंशाच्या नागरिकांनीही कौतुक केले आहे. - तमिळी संस्कृतीबद्दल सिंगापूरमधील युवा पिढीलाही अभिमान आहे. पोंगल सणानिमित्त सुधा रवी व त्यांची मुलगी रक्षिता यांनी आइस्क्रीमच्या कांड्यांच्या साहाय्याने साकारलेली रांगोळी त्याचीच साक्ष देते, असे सिंगापूरमधील तमिळ समाजातील एक मान्यवर वैरावन यांनी सांगितले.