शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ७१७ भाविक ठार

By admin | Updated: September 24, 2015 18:46 IST

सौदी अरेबियात हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन ७१७ भाविक मृत्यूमुखी पडले असून ५०० पेक्षा जास्त यात्रेकरू जखमी झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

रियाध, दि. २४ - मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौदी अरेबियातील मक्का मशिदीजवळ हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन ७१७  भाविक मृत्यूमुखी पडले असून ५०० पेक्षा जास्त  भाविक जखमी झाले आहेत. मक्का शहराबाहेर सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या मीना येथे ही दुर्घटना घडली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान मृतांमध्ये कोणी भारतीय भाविक होते का याबद्दल अद्याप माहिती समजू शकलेले नाही. यंदा भारतातून १ लाख ३६ हजार भाविक हज यात्रेसाठी गेले आहेत.
 
यावर्षी हज यात्रेत जगभरातून सुमारे २० लाख भाविक सहभागी झाले होते.  आज तेथे बकरी ईद साजरी होत असून या दिवशी मक्केतील मुख्य मशिदीबाहेर मीना येथे सैतानाला दगड मारण्याची जुनी पंरपरा आहे. दुष्ट प्रवृत्तींचा विनाश व्हावा अशी त्यामागची संकल्पना असून त्यात सात वेळा दगड मारला जातो. आज या विधीसाठी सुमारे १५ लाख भाविक मशिदीजवळ जमले होते. दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती, मात्र अचानक धावाधाव झाल्याने भीषण चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांना प्राण गमवावे लागले. दरम्यान हे वृत्त कळताच मदत व बचाव पथकाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुूरू केले. अनेक जवान व शेकडो अँब्युलन्स तेथे दाखल झाल्या  असून जखमींवर उपचार केले जात आहेत तर गंभीर जखमींना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे समजते. .
अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच मक्का येथील ग्रँड मशिदीत क्रेन कोसळून १०७ जण मृत्यूमुखी पडले होते. काही दिवसांतच पुन्हा अशी दुर्घटना घडल्याने जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. 
दरम्यान भारतीय परराष्ट्रखात्याने सौदीमधल्या स्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत असल्याचे आणि अद्याप तरी भारतीय नागरीक दुर्घटनेत आढळल्याचे वृत्त नसल्याचे सांगितले. सौदीमधल्या विविध रुग्णालयांमध्ये भारतीय डॉक्टर्स तैनात असल्याची माहितीही परराष्ट्र खात्याने दिली आहे.