शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बमुळे ७० हजार लोकांचे स्थलांतर

By admin | Updated: February 13, 2017 00:26 IST

थेसालोनिकी या ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात सापडलेला दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब निकामी करण्यासाठी स्थानिक

अ‍ॅथेन्स : थेसालोनिकी या ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात सापडलेला दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब निकामी करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल ७० हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.उत्तर ग्रीसमधील या शहरात एका रस्त्यासाठी खोदकाम सुरु असता गेल्या आठवड्यात २५० किलो स्फोटके असलेला हा जिवंत बॉम्ब सापडला होता. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील आहे. या महायुद्धात ग्रीस दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने प्रत्यक्ष युद्धात उतरले नव्हते. त्यामुळे हा बॉम्ब त्यावेळी नेमका कोणी व केव्हा टाकला याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.एवढा शक्तिशाली जिवंत बॉम्ब सापडणे व तो निकामी करण्यासाठी दाट लोकवस्ती असलेले शहराचे बरेच भाग खाली करावे लागणे या दोन्ही दृष्टीने ग्रीसच्या बाबतीत ही घटना न भूतो अशीच म्हणावी लागेल. बॉम्ब सापडला त्या ठिकाणाच्या १.९ किमी परिघातील सर्व लोकवस्ती हलविली गेली. यात दोन कामगारवस्त्यांचाही समावेश आहे. सुमारे एक हजार पोलीस अधिकारी गेले दोन दिवस हे काम करीत होते. प्रसिद्धी माध्यमे, छापील पत्रके व समाजमाध्यमांवर संदेश टाकून त्या भागांतील रहिवाशांना नियोजित स्थलांतराची आधीच कल्पना देण्यात आली. सर्वप्रथम २० रुग्णवाहिका कामाला लावून ३०० हून अधिक अपंग व्यक्ती व अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गेल्या वर्षभरात आफ्रिका व आशियातून आलेल्या स्थलांतरितांसाठी शहराच्या हद्दीजवळ उभारलेली हंगामी निर्वा सित शिबिरेही खाली करावी लागली. (वृत्तसंस्था)अनेक ठिकाणी सापडले बॉम्बदुसरे महायुद्ध संपून ७० वर्षे झाल्यावर, त्या वेळचे न  फुटलेले बॉम्ब जगाच्या अनेक भागांत अजूनही मिळत आहेत.२३ जानेवारी रोजी हाँगकाँग विद्यापीठाजवळ सापडलेला बॉम्ब निकामी करण्यासाठी अनेक लोकांना अन्यत्र हलवावे लागले होते.त्या आधी २०जानेवारी रोजी लंडनमध्ये ब्रिटिश संसदेजवळ सापडलेला एक बॉम्ब नौदलाने निकामी केला होता.दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनने टाकलेला बॉम्ब जर्मनीमधील आॅसबर्ग शहरात २५ डिसेंबर रोजी सापडला होता. त्या वेळी त्या भागातील ५४ हजार लोकांना राहती घरे सोडून अन्यत्र जावे लागल्याने, त्यांच्या नाताळाच्या आनंदावर विरजण पडले होते.