शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षांच्या सहजीवनाचा शेवटही लगोलग मृत्यूने!

By admin | Updated: April 4, 2017 18:20 IST

तब्बल ७० वर्षांच्या सहजीवनानंतर एका ब्रिटिश दाम्पत्याचा अवघ्या चार मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. यातील विल्फ रसेल या ९३ वर्षांच्या पतीचे

ऑनलाइन लोकमतलंडन, दि.4 - तब्बल ७० वर्षांच्या सहजीवनानंतर एका ब्रिटिश दाम्पत्याचा अवघ्या चार मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. यातील विल्फ रसेल या ९३ वर्षांच्या पतीचे गेल्या बुधवारी सकाळी ६.५० वाजता निधन झाले आणि त्यांची ९१ वर्षांची पत्नी वेरा हिने सकाळी ६.५४ वाजता अखेरचा श्वास घेतला.ही विचित्र योगायोगाची घटना लिचेस्टरशायर परगण्यात घडली. तेथील विंग्स्टन शहरातील मॅग्ना केअर होममध्ये विल्फ यांना ठेवलेले होते तर त्याच्या शेजारीच असलेल्या लिचेस्टर रॉयल इन्फर्मरीमध्ये वेराची सुश्रुशा केली जात होती. विल्फ यांना गेले काही दिवस स्मृतिभ्रंश झाला होता व ते अीपल्या पत्नीलाही ओळखेनासे झाले होते. पती आपल्याला ओळखही दाखवत नाही या चिंतेने वेरा यांनीही अंथरुण धरले होते.या दाम्पत्याची नात स्टेफनी वेल्च हिने ‘लिचेस्टर मर्क्युरी’ वृत्तपत्रास सांगितले की, आजोबांना वर्षभरापूर्वी स्मृतिभ्रंश झाला व दोन महिन्यांपूर्वी त्यांना केअर होममध्ये ठेवण्यात आले. काही दिवसांपूर्वी आजी त्यांना भेटायला गेली तेव्हा त्यांनी तिला ओळखलेही नाही. त्या दिवसापासून आजीची प्रकृतीही खालावत गेली.स्टेफनी म्हणाली की, गेल्या रविवारी मी आजीला भेटायला रॉयल इन्फर्मरीमध्ये गेले तेव्हा सर्वप्रथम तिने विल्फ कसे आहेत, याची चौकशी केली. ‘आमचा जोडा किती छान आहे ना?’, हा तिने मला विचारलेला शेवटचा प्रश्न होता.आजोबा गेले आणि लगोलग चार मिनिटांनी आजीनेही प्राण सोडले. आजोबा गेल्याचे तिला कुणी सांगितले नाही, पण बहुधा ती त्यांच्या जाण्याची वाट पाहात होती, असे वाटते. आजोबांनी ओळखणेही बंद केले हे आजीच्या मनाला खूप लागले होते, असेही स्टेफनी हिने सांगितले.स्टेफनी म्हणते की, विल्फ आणि वेरा हे एक आदर्श जोडपे होते व त्यांचे स्वभावही एकमेकांना पूरक असेच होते. दोघांनीही कुटुंबावर जीवापाड प्रेम केले व सर्वांचे उत्तम संगोपन केले. आजोबांना केअर होममध्ये ठेवेपर्यंत दोघे एक दिवसही एकमेकांना सोडून राहिले नव्हते.- या दोघांची प्रथम भेट झाली तेव्हा विल्फ १८ वर्षांचा व वेरा १६ वर्षांची होती.- दोघे प्रेमात पडले. पुढे विल्फ अभियंता झाला व सैन्यात दाखल झाला.- दुसरे महायुद्ध सुरु झाले व विल्फला उत्तर आफ्रिकेत जावे लागले. तेथे जाण्यापूर्वी दोघांचा साखरपुडा झाला.- आफ्रिकेतून विल्फ परत आल्यावर दोघांनी लग्न केले व त्यानंतर विल्फने मध्य इंग्लडमध्ये अभियंता म्हणून नोकरी केली.