शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

६५ वर्षांच्या महिलेस होणार चौपाळे

By admin | Updated: April 16, 2015 01:36 IST

आतापर्यंत तेरा मुले व सात नातवंडे असणारी जर्मन महिला वयाच्या ६५ व्या वर्षी गर्भवती असून तिला चार मुले होणार आहेत.

बर्लिन : आतापर्यंत तेरा मुले व सात नातवंडे असणारी जर्मन महिला वयाच्या ६५ व्या वर्षी गर्भवती असून तिला चार मुले होणार आहेत. या वयात मुले होणे ही आश्चर्याची बाब राहिलेली नाही. पण ६५ व्या वर्षी चार मुले होणे ही मात्र निश्चितच दुर्मिळ गोष्ट आहे. अनरग्रेट रौनिक असे या महिलेचे नाव असून सध्या तिला पाचवा महिना आहे. गर्भवती व मुले सुखरूप असल्याचे डॉक्टरांचे निदान आहे. एकाच वेळी चौपाळे जन्माला घालणारी ती पहिली वयोवृद्ध महिला ठरणार आहे. आपल्या वयाला आपण गर्भवती होऊ की नाही अशी तिला शंका होती. पण गर्भधारणा झाल्यानंतर मात्र या मुलांना वाढवायचेच असा तिचा निर्णय आहे. ६५ व्या वर्षी माता बनणार असली तरीही अनरग्रेट सर्वात वयोवृद्ध माता नाही. स्पेनमधील मारिया कार्मेन बौसुदा लारा या महिलेने २००६ साली वयाच्या ६६ व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे, तर भारतातील उत्तर प्रदेशातील ओंकारी पनवर या महिलेने तर २००८ साली वयाच्या ७० व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अनरग्रेटला १३ मुले अनरग्रेट ही प्राथमिक शिक्षिका आहे. आपल्या प्रसूतीआधी ती निवृत्त होणार आहे. नऊ वर्षापूर्वी वयाच्या ५५ व्या वर्षी माता बनली तेव्हा ती जर्मन टीव्हीवर चमकली होती. अनरग्रेट ही रशियन व इंग्रजी भाषेची प्राथमिक शिक्षिका आहे. या जगावेगळ्या प्रसूतीसाठी तिला किती खर्च आला हे ती सांगत नाही. पण नऊ वर्षापूर्वी तिने वयाच्या ५५ व्या वर्षी लीला या मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी ती जर्मनीतील वयोवृद्ध माता ठरली होती. या १३ मुलातील सर्वात मोठे मूल ४३ वर्षांचे आहे. (वृत्तसंस्था)४रजोनिवृत्तीच्या काळात गर्भधारणा व्हायची असेल तर त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. त्यांना दुसऱ्या महिलेचे बीजांड घ्यावे लागते किंवा स्वत:चा गोठवलेला गर्भ वापरावा लागतो. ४महिलांची गर्भधारणेची क्षमता वयाबरोबर कमी होते. वयाच्या ३५ नंतर तर ती झपाट्याने कमी होते. त्यानंतर गर्भाशय गर्भधारणेस सक्षम आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागते. वय जास्त असणाऱ्या महिलांना गर्भधारणेच्या काळात रक्तदाब व मधुमेह असेही त्रास होतात.मुलीच्या इच्छापूर्तीसाठी घेतला निर्णय४तिची सर्वात लहान मुलगी लीला आता ९ वर्षांची आहे. तिला एक लहान बाळ हवे होते, पण आईला चार मुले होणार आहेत. ही मुले वाढविण्याचा ताण अनरग्रेटला नाही. पण लीला वयात येईपर्यंत ही मुले मोठी होतील. ही मुले मी वाढवू शकेन असा मला विश्वास आहे. माझी प्रकृती चांगली आहे, त्यामुळे चार मुले लहान असली तरीही नो प्रॉब्लेम, असे अनरग्रेट म्हणते.