शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रशियात विमान कोसळून 62 प्रवासी ठार, दोन भारतीयांचा समावेश

By admin | Updated: March 19, 2016 13:43 IST

दुबईहून रशियाला जाणारे एक विमान दक्षिण रशियातील रोस्तोव-ऑन-डॉनमध्ये कोसळून ६१ प्रवासी ठार झाले.

ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. १९ - रशियामध्ये एका प्रवासी विमानाला लँडिंग करताना झालेल्या अपघातात क्रू मेंबर्ससह विमानातील सर्व 62 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृत प्रवाशांमध्ये दोघा भारतीयांचाही समावेश आहे. दुबईहून रशियाला जाणारे हे विमान रशियातील दक्षिण भागातील रोस्तोव-ऑन-डॉनमध्ये पडले आणि हा दुर्दैवी अपघात घडला. 
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लायदुबई FZ981 हे विमान रोस्तोव-ऑन-डॉन येथे लँड करत असताना कोसळले आणि अवघ्या काही क्षणांच संपूर्ण विमानाने पेट घेतला. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि स्थानिक आपत्कालीन सेवेतील अधिका-यांनी या दुर्घटनेची पुष्टी दिली असून विमानातील ५५ प्रवासी व ६ क्रू मेंबर्ससह सर्वांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले.
मात्र या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. दरम्यान या दुर्घटनेनंतर हे विमानतळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून इतर विमानांच्या उड्डाणात बदल करण्यात आले आहेत. ही दुर्घटना वादळी वाऱ्यांमध्ये विमान सापडल्याने झाली असावा असा अंदाज रोस्तोव प्रांताचे गव्हर्नर वासुली गोलूबोव यांनी व्यक्त केला आहे.