शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या हवाई हल्ल्यात ५० अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Updated: June 16, 2014 03:54 IST

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी रविवारी उत्तर वजिरीस्तानात केलेल्या हल्ल्यांत ५० अतिरेकी मारले गेले.

इस्लामाबाद : पाकिस्तानी लढाऊ विमानांनी रविवारी उत्तर वजिरीस्तानात केलेल्या हल्ल्यांत ५० अतिरेकी मारले गेले. यापैकी बहुतांश उझबेकिस्तानचे असून कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ हल्ल्यातील एका सूत्रधाराचाही त्यामध्ये समावेश आहे. उत्तर वजिरीस्तानच्या देगापन व दत्ता खेल भागात सकाळी करण्यात आलेल्या हल्ल्यात उझबेक अतिरेक्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य बनविण्यात आले. हे दहशतवादी विमानतळ हल्ल्याशी संबंधित होते, असे लष्कराच्या एका निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्यांत ५० दहशतवादी मारले गेले असून स्फोटकांचा एक साठाही नष्ट करण्यात आला. डॉनने कराची विमानतळ हल्ल्याचा कट रचणारा सूत्रधारही यात मारला गेल्याचे वृत्त दिले आहे. काही वृत्तांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या १०० असल्याचे म्हटले आहे; मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. एक्स्प्रेस ट्रीब्यूनच्या वृत्तानुसार, लढाऊ विमानांनी बॉम्बहल्ले केल्यामुळे सामान्य नागरिकही मारले गेल्याची भीती व्यक्त होत असून यात महिला आणि मुलांचा समावेश असू शकतो. या हवाई हल्ल्यांच्या एक आठवडा आधी १० उझबेक अतिरेक्यांनी कराची विमानतळावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी १३ तास चाललेल्या कारवाईत दहा दहशतवाद्यांसह ३७ जण मारले गेले होते. विमानतळावरील हल्ल्यानंतर पाकवर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी दबाव वाढत चालला आहे. मंगळवारी पाकच्या जेट विमानांनी उत्तर वजिरीस्तानच्या आदिवासी भागातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य बनविले होते. यात २५ दहशतवादी मारले गेले होते. त्या दिवशी अमेरिकेनेही उत्तर वजिरीस्तानात ड्रोन हल्ले केले होते. यात १६ दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. (वृत्तसंस्था)