शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड साजीदला पकडण्यासाठी ५० लाख डॉलरचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 07:15 IST

अमेरिकेची घोषणा; लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी

वॉशिंग्टन : मुंबईवर बारा वर्षांपूर्वी, २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण हल्ल्याच्या कटाचा मास्टरमाइंड व लष्कर- ए-तय्यबाचा दहशतवादी साजीद मीर याला पकडण्यासाठी खात्रीलायक माहिती देणाऱ्यास अमेरिकेने ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले. यासंदर्भात अमेरिकेने एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या लष्कर- ए- तय्यबाच्या १० प्रशिक्षित दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने भारतात घुसखोरी केली. 

त्यांनी मुंबईत येऊन ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, लिओपोड कॅफे, नरिमन (छबड) हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अशा विविध ठिकाणी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेल्या  हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते.  या हल्लेखोरांपैकी फक्त अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. अजमल याला ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. मुंबईवरील हल्ल्याची आखणी व अंमलबजावणीची जबाबदारी लष्कर- ए- तय्यबाने साजीद मीरकडे सोपविली होती. (वृत्तसंस्था)

मीरवर अमेरिकेत खटलामुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याप्रकरणी अमेरिकेत सुरू असलेल्या एका खटल्यात साजीद मीर हा आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. लष्कर-ए- तय्यबा ही दहशतवादी संघटना असल्याचे अमेरिकेने डिसेंबर २००१ मध्ये जाहीर केले होते.

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाAmericaअमेरिका