समुद्रातील थरार : चालक पथक फरार, तटरक्षक दलाने घेतला ताबारोम : चालक पथकाविना इटलीकडे येत असलेल्या जहाजाचा इटालियन तटरक्षक दलाने ताबा घेतला आहे. ४५० स्थलांतरित लोक असलेले हे जहाज चालक पथकाने बेवारस सोडले होते. या जहाजाला आता बंदराकडे नेण्यात येत आहे, असे इटालियन प्रशासनाने सांगितले.सिएरा लिओनचा ध्वज असलेल्या इझादीन या जहाजात सिरियन स्थलांतरित आहेत. २४० फूट लांबीचे हे जहाज तुर्कीहून निघाले असावे, असे तटरक्षक अधिकाऱ्याने सांगितले. एका स्थलांतरिताने जहाजावरील संदेशवहन यंत्रणेचा वापर करत जहाज व प्रवासी संकटात असल्याचा संदेश दिला होता. आम्ही इटालियन किनाऱ्याकडे जात असून जहाजावर चालक पथक नाही, असेही या स्थलांतरिताने सांगितले होते. ५० वर्षांपूर्वी बांधलेले हे जहाज पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. लेबनानी कंपनीच्या नावावर नोंदणी असलेल्या या जहाजाचा ताबा मानव तस्करांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)४या घटनेच्या दोन दिवस आधी इटालियन नौसैनिकांनी चालक पथक नसलेले एक मालवाहू जहाज अडविले होते. १००० हून जास्त प्रवासी असलेल्या या जहाजातही चालक पथक नव्हते. बहुतांश सिरियाई प्रवासी असलेले हे जहाज इटलीच्या आग्नेय किनारपट्टीकडे जात होते. ४तुर्कीहून ग्रिस सागरी क्षेत्राकडे जात असताना काही तस्कर या जहाजावर आले होते; मात्र नंतर ते निघून गेले. हे जहाज किनाऱ्यापासून पाच मैलावर ४५ मिनिटे थांबले. तेव्हा हेलिकॉप्टरच्या मदतीने सहा नौदल अधिकाऱ्यांना त्यावर उतरविण्यात आले व त्यांनी जहाजाला यशस्वीरीत्या किनाऱ्यावर आणले.४इटालियन रेडक्रॉसने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजात ६० मुले व दोन गर्भवती महिला होत्या. एका महिलेची तर जहाजातच प्रसूती झाली. जहाजातील अनेक प्रवाशांची प्रकृति ठीक नव्हती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
४५० प्रवाशांचे जहाज सोडले बेवारस
By admin | Updated: January 3, 2015 02:42 IST