शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

आयएसकडून ४३ शांती सैनिकांचे अपहरण

By admin | Updated: August 30, 2014 03:29 IST

आयएसच्या दहशतवाद्यांनी गोलान हाईटस्मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) ४३ शांती सैनिकांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे

संयुक्त राष्ट्रसंघ : आयएसच्या दहशतवाद्यांनी गोलान हाईटस्मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) ४३ शांती सैनिकांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे. अपहृत शांती सैनिक फिजीचे आहेत, असे युनोचे प्रवक्ते स्टिफाने दुजारिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले. इस्रायल सीमेजवळील गोलान हाईटस् भागात आयएस दहशतवादी व सिरियन सैन्यदलातील धुमश्चक्रीदरम्यान या शांती सैनिकांचे अपहरण करण्यात आले. सिरिया आणि इस्रायलदरम्यान शस्त्रसंधी लागू करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९७४ मध्ये गोलान हाईटस् येथे शांती सैनिकांची तैनाती केली होती. हा भाग इस्रायलने १९६७ मध्ये ताब्यात घेतला होता. आयएसने गुरुवारी युनोच्या ४३ शांती सैनिकांचे अपहरण करतानाच ८१ शांती सैनिकांची चहूकडून कोंडी केली आहे. हे शांती सैनिक फिलीपाईन्सचे आहेत. २०११ मध्ये सिरियात उफाळलेल्या यादवीची शांती सैनिकांना झळ बसू लागल्यामुळे काही दिवसांपूर्वीच फिलीपाईन्सने गोलान हाईटस्मधील आपले ३३१ शांती सैनिक काढून घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ही घटना घडली. गेल्या सप्टेंबरमध्ये फिलीपाईन्सच्या २१ शांती सैनिकांचे सिरियन बंडखोरांनी अपहरण केले होते; मात्र आठवडाभरात त्यांची सुटका करण्यात आली होती. आयएसने अपहृत सिरियन सैनिकांचे हत्याकांड घडवून आणल्याच्या पार्श्वभूमीवर अपहृत शांती सैनिकांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. आयएसने पकडलेल्या शांती सैनिकांची सुखरूप सुटका घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रयत्नशील आहे, असेही दुजारिक यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)