शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

४२ दिवसांत एकट्याने पूर्ण केली पृथ्वीची सागरी परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:08 IST

फ्रँकॉई गेबार्ट या फ्रेंच नाविकाने न थांबता एकट्याने पृथ्वीची सागरी परिक्रमा सर्वात कमी वेळात पूर्ण करण्याचा नवा विश्वविक्रम रविवारी प्रस्थापित केला.

ब्रेस्ट (फ्रान्स): फ्रँकॉई गेबार्ट या फ्रेंच नाविकाने न थांबता एकट्याने पृथ्वीची सागरी परिक्रमा सर्वात कमी वेळात पूर्ण करण्याचा नवा विश्वविक्रम रविवारी प्रस्थापित केला.फ्रँकॉईने ही प्रदक्षिणा ४२ दिवस, १६ तास, ४० मिनिटे व ३५ सेकंदात पूर्ण केली. याआधीचा विक्रम फ्रान्सच्याच थॉमस कोविले यांनी गेल्या वर्षी केला होता. फ्रँकॉईने सहा दिवस व १० तासांचा कमी वेळ घेऊन त्यांचा विक्रम सहज मोडला.फ्रान्सच्या वायव्य टोकाजवळ असलेले उशांत बेट आणि इंग्लंडच्या नैऋत्येस असलेला लिझार्ड पॉर्इंट यांच्या दरम्यान या सागरी पृथ्वी परिक्रमेच्या समाप्तीची काल्पनिक रेखा ठरविण्यात आली होती. ३४ वर्षांच्या फ्रँकॉई यांनी ब्रिटिश प्रमाण वेळेनुसार रविवारी पहाटे १.४५ वाजता समाप्तीरेषा पार केली.‘वर्ल्ड सेलिंग स्पीड कौन्सिल’च्या निरीक्षकाने फ्रँकॉई यांनी परिक्रमेसाठी घेतलेल्या वेळेची घोषणा केली. बोटीतील ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस डेटाशी पडताळणी केल्यानंतर या वेळेची नंतर अधिकृत पुष्टी केली जाईल. दोन मुलांचा पिता असलेल्या फ्रँकॉई यांनी ३०मीटर लांबीच्या अत्याधुनिक ‘मॅक्सी-ट्रायमरान’ बोटीतून ही सागरी सफर केली.खासकरून प्रशांत महासागरातील अत्यंत खडतर आणि सर्वाधिक लांबीच्या प्रवासात नशिबासोबतच चांगले हवामान व उपयुक्त वाºयांची साथ मिळाल्याने त्यांना हा विक्रम करणे शक्य झाले. या सफरीत त्यांनी एकाकी सागरी सफरीचे अनेक नवे उच्चांकही प्रस्थापित केले. यात सर्वात कमी वेळात प्रशांत महासागर पार करणे ( सात दिवस, १५ तास व १५ मिनिटे) व २४ तासांत सर्वाधिक अंतर कापणे (८५१ मैल) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)प्रवासात ३० दिवसांची घट-या प्रकारच्या स्पर्धात्मक सागर सफरीची सुरुवातसन २००४ मध्ये झाल्यापासून प्रवासाचा वेळसुमारे ३० दिवसांनी कमी झाला आहे.