शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

४०१ जणांनी १० तास केली मोजणी; बांगलादेशातील 'या' मशिदीला भरभरून दान, फक्त २४ तासांत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 08:47 IST

१० तास चाललेल्या या मोजणी प्रक्रियेत ४०१ जण मोजणी करत होते. जेव्हा दानपेटी उघडण्यात आली तेव्हा त्यातील पैसा २८ पोत्यात भरण्यात आला.

बांगलादेशच्या किशोरगंज जिल्ह्यातील ऐतिहासिक पगला मशिदीत एका दिवसात रेकॉर्डब्रेक दान मिळालं आहे. शनिवारी मशिदीतील दान पेटीतील रक्कम दिवसभर मोजण्यात आली जेव्हा मोजणी पूर्ण झाली तेव्हा त्यात एकूण ९.१८ कोटी रुपये जमा झाले होते. ही रक्कम आतापर्यंतच्या इतिहासात मशि‍दीला एकाच दिवसात मिळालेल्या दानापैकी सर्वाधिक आहे. भारतात तामिळनाडूतील मंदिरात जसं दान मिळते तसेच पगला मशिदीत लोकांची आस्था मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात दान मिळालं आहे.

याआधी बांगलादेशात सर्वाधिक दान याच मशिदीत जवळपास ८.२१ कोटी जमा झाले होते. ३० नोव्हेंबर २०२४ मध्ये ही मोजणी करण्यात आली होती. एका रिपोर्टनुसार, मोजणीनंतर सर्व पैसा रूपाली बँकेच्या किशोरगंज शाखेत जमा करण्यात आला. दानपेटीत परदेशी मुद्रा आणि सोने, इतर दागिने जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षित ठेवण्यात आले. 

१० तास मोजणी सुरू

किशोरगंजचे उप आयुक्त आणि पगला मस्जिद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फौजिया खान यांनी सांगितले की, सकाळी ७ वाजल्यापासून मशिदीतील दान पेटीतील रक्कमेची मोजणी सुरू होती. ती संध्याकाळी ५ च्या सुमारास पूर्ण झाली. १० तास चाललेल्या या मोजणी प्रक्रियेत ४०१ जण मोजणी करत होते. जेव्हा दानपेटी उघडण्यात आली तेव्हा त्यातील पैसा २८ पोत्यात भरण्यात आला. त्यात खूप मोठ्या प्रमाणात परदेशी चलन आणि सोन्याचे दागिने यांचाही समावेश होता.

इतक्या दानाचे काय करणार?

नदी किनारी असलेल्या या मशिदीत नेहमीप्रमाणे सर्वात जास्त दान मिळते. दर ३ ते ४ महिन्यांनी दानपेटी उघडली जाते. या पैशातून पगला मस्जिद आणि इस्लामिक कॉम्प्लेक्सचा खर्च केला जातो. बाकी पैसा बँकेत जमा केला जातो. या फंडातून जिल्ह्यातील इतर दुसऱ्या मस्जिद, मदरसा, अनाथालय यासह वंचित आणि गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या लोकांची मदत केली जाते. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश