शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात ३६ ठार

By admin | Updated: April 15, 2017 05:25 IST

अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब हल्ल्यात इसिसचे ३६ हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. अनेक बोगदे आणि बंकर

जलालाबाद : अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब हल्ल्यात इसिसचे ३६ हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. अनेक बोगदे आणि बंकर या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या हल्ल्यात मनुष्यहानी झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातून पळून इसिसमध्ये सहभागी झालेले २0 जण या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त असले तरी त्याला कोठूनही दुजोरा मिळालेला नाही. केरळमधील इसिसमध्ये गेलेला एक तरुण ठार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र काहींच्या मते तो अन्यत्र ठार झाला. (वृत्तसंस्था)या बॉम्बहल्ल्याची पूर्वकल्पना पाकिस्तान व अफगाणिस्तान यांना अमेरिकेने दिली होती. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाने सांगितले की, मनुष्यहानी टाळण्यासाठी पूर्ण सावधानता बाळगण्यात आली. हा स्फोट ११ टन टीएनटीच्या स्फोटाशी समकक्ष होता. हवाई दलाचे प्रवक्ते कर्नल पॅट रायडर यांनी सांगितले की, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा नॉनन्यूक्लिअर बॉम्ब होता. अमेरिकेने जीबीयू ४३ एमओएबी या बॉम्बने हा हल्ला केला. या बॉम्बला ‘मदर आॅफ आॅल बॉॅम्ब’ असेही संबोधले जाते. नांगरहार प्रांतात अचिन जिल्ह्यात मोमांद डारा भागात इसिसच्या ठिकाणांवर स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री साडेसात वाजता हा हल्ला करण्यात आला. ही मोहीम अतिशय यशस्वी झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.