शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियन नागरिकांना ३० दिवसांचा फ्री व्हिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 04:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या फ्री व्हिसाची घोषणा केली.

जाकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या फ्री व्हिसाची घोषणा केली. इंडोनेशियाच्या नागरिकांनी त्यांचे मूळ असलेल्या देशाला भेट द्यावी व ‘नवा भारत’ अनुभवावा, असे निमंत्रणही त्यांनी दिले.तत्पूर्वी, इंडोनेशियात तीन चर्चेसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मोदी यांनी तीव्र निषेध केला व इंडोनेशियाने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या लढाईत भारत त्याच्यामागे ठामपणे राहील, अशी ग्वाही दिली.इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांच्या दौऱ्यावर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे आगमन झाले. येथील जाकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बुधवारी भारतीय समुदायाशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, आमच्या देशांच्या नावांतच यमक आहे, असे नाही तर भारत आणि इंडोनेशियाच्यामैत्रीत सुरुवातीपासून विलक्षण अशी लय आहे. भारतातर्फे आम्ही इंडोनेशियाती नागरिकांना३० दिवसांच्या प्रवासासाठी विनामूल्य व्हिसा मंजूर करीत आहोत. तुमच्यापैकी अनेक जणआजवर कधीही भारतात आलेले नसावेत. भारतात प्रयागमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या भव्य कुंभमेळ््याला जरूर या, असे मी तुम्हाला निमंत्रण देत आहे.मशिदीला दिली भेटइंडोनेशियात आग्नेय अशियातील सर्वात मोठ्या इस्तिकलाल मशिदीला मोदी यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत विडोडो होते. मशिदीला भेट देऊन आनंद झाल्याचे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांच्या दौºयावर मंगळवारी मोदी यांचे जाकार्तामध्ये आगमन झाले.अर्जुन विजय रथ : जाकार्ता शहरातील अर्जुन विजय रथ पुतळ््याला मोदी यांनी जोको विडोडो यांच्यासह भेट दिली. आठ अश्व ओढत असलेल्या या रथाचे सारथ्य श्रीकृष्ण करीत असून रथामध्ये अर्जुन धनुष्य व बाण घेऊन उभा आहे.स्मारकावर पुष्पचक्रइंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण गमावलेल्यांना मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. येथील कालिबाता नॅशनल हिरोज दफनभूमीत मोदी यांनी हुतात्म्यांसाठी पुष्पचक्र वाहिले. सैनिकी डावपेचांच्यादृष्टिने महत्वाच्या असलेली अंदमान आणि निकोबार बेटे आणि इंडोनेशियात व्यापार, पर्यटन व लोकांच्या एकमेकांशी थेट संपर्काला प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशांनी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याचे मान्य केले. नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.गेल्या अडीच वर्षांत भारतात नऊ हजारांपेक्षा जास्त स्टार्टअपस्ची नोंदणी झाली आहे. इंडोनेशियात राहणाºया माझ्या मित्रांनो हे भारतात घडत आहे. कायदे तेच आहेत, अधिकारीही तेच, कार्यालयेही तीच, टेबल्स आणि खुर्च्याही त्याच. बदलले आहे ते फक्त सरकार आणि देश बदलतो आहे. - मोदीमृत्युमुळे दु:ख : जोको विडोडो यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दिलेल्या निवेदनात मोदी म्हणाले की, मित्रांनो, इंडोनेशियातील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने मला दु:ख झाले आहे.