शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सीरियातील युद्धात ३ लाख ठार, ४८ लाख निर्वासित

By admin | Updated: December 25, 2016 01:00 IST

सीरियातील युद्धात आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त लोक ठार झाले आहे. या देशाची अर्धी लोकसंख्या निर्वासित झाली आहे. या युद्धात संपूर्ण देश बेचिराख झाला आहे.

बैरूत : सीरियातील युद्धात आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त लोक ठार झाले आहे. या देशाची अर्धी लोकसंख्या निर्वासित झाली आहे. या युद्धात संपूर्ण देश बेचिराख झाला आहे.द सीरियन आॅब्झर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स या ब्रिटनस्थित संस्थेने ही माहिती जारी केली आहे. संस्थेने म्हटले की, मार्च २0११ मध्ये सिरियात सरकारविरोधी बंडाला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यापर्यंत त्यात ३,१२,00१ लोक मारले गेले आहेत. मृतांमध्ये १६ हजार मुलांसह ९0 हजार सामान्य नागरिकांचा समावेश आहे. युद्धापूर्वी सीरियाची लोकसंख्या २३ दशलक्ष होती. त्यापैकी सुमारे ६.६ दशलक्ष लोक विस्थापित झाले असावेत, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. याशिवाय सुमारे १0 लाख लोक युद्धग्रस्त भूभागात अडकून पडले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख स्टीफन ओब्रेन यांनी म्हटले आहे. सीरियातील सरकारी फौजांकडूनही मोठ्या प्रमाणात क्रूरपणाच्या कारवाया केल्या जात आहेत, असे त्यांनी नोव्हेंबरमध्ये म्हटले होते. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित विषयक उच्चायुक्तांनी सांगितले की, युद्धग्रस्त सीरियामधून ४८ लाख लोक पळून गेले आहेत. २७ लाख सीरियाई नागरिकांना शेजारील तुर्कस्तानने आश्रय दिला आहे. (वृत्तसंस्था)याशिवाय जॉर्डनमध्ये ६,५५,000, इराकमध्ये २,२८,000, इजिप्तमध्ये १,१५,000 सीरियाई नागरिकांनी आश्रय घेतला आहे. आॅगस्टमध्ये अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने सिरियाई सरकारवर क्रूरपणे छळ चालविल्याचा आरोप केला आहे. विशेषत: तुरुंगात हा छळ केला जात आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून तुरुंगात १७,७00 लोक मरण पावल्याचे अ‍ॅम्नेस्टीने म्हटले होते. हा आकडा अधिकृतरीत्या समोर आला आहे. वास्तविक, हा आकडा त्यापेक्षा खूप मोठा असू शकतो, असेही अ‍ॅम्नेस्टीने म्हटले आहे.