वॉशिंग्टन : अल काईदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार मारल्यानंतर अबोटाबाद येथील त्याच्या निवासस्थानातील गोळा केलेली कागदपत्रे आता प्रसिद्ध केली आहेत. या कागदपत्रांत विविध दहशतवादी हल्ल्यांचे वर्णन ओसामाच्या शब्दांत करण्यात आले आहे. त्यात २६-११ चा मुंबईवरील हल्ला हा शौर्यपूर्ण होता, असे म्हटले आहे, तर पुण्यातील जर्मन बेकरीवरील हल्ला सुंदर होता, अशी प्रतिक्रिया लादेनने दिली आहे. १५ पानी दस्तऐवज इंग्रजी भाषेत आहे. मुंबईच्या २६-११ च्या हल्ल्याला आशीर्वाद मिळालेला हल्ला संबोधले आहे. अल काईदा व मित्र संघटनांनी अमेरिका व मित्रराष्ट्रे ब्रिटन, जर्मनी व भारताच्या नागरिकांना लक्ष्य करावे, असे म्हटले आहे. जागतिक मुजाहिदीन सदस्यांचे मुख्य लक्ष्य अमेरिकेची अर्थव्यवस्था हे असले पाहिजे. या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचविण्यासाठी विविध देशांतील अमेरिकेच्या आर्थिक संस्थांवर हल्ले झाले पाहिजेत, असेही यात नमूद आहे. लंडनमधील बॉम्बस्फोटानंतर व त्याआधी आशीर्वाद मिळालेले अनेक हल्ले झाले आहेत. त्यानंतर भारतातच पुणे शहरातील जर्मन बेकरीवर झालेला हल्ला. या पाश्चिमात्य बेकरीत ज्यू व पाश्चिमात्य नागरिकांचे येणे-जाणे असते. हा हल्ला सुंदरच होता, असे २०१० सालच्या या हल्ल्याबद्दल म्हटले आहे. (वृत्तसंस्था)पारदर्शितेसाठी आग्रह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पारदर्शितेसाठी धरलेल्या आग्रहामुळे ही माहिती बाहेर आली आहे. या कागदपत्रांवर नजर टाकली असता असे लक्षात येते की लादेनला मुंबई हल्ल्याची माहिती होती व त्याच्यालेखी हा हल्ला यशस्वी झाला होता. या कागदपत्रांत अल काईदाचा पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला कडवा विरोध होता. ती अमेरिकन सीआयएची मित्र संघटना आहे, असा लादेनचा आरोप होता. मोफत माहिती अमेरिकेला विकली आयएसआयच्या कुत्र्यांनी २००३ ते ०६ दरम्यान आदिवासी नागरिकांकडून पैशाच्या मोबदल्यात तसेच अटक केलेल्या मुजाहिदीन व नागरिकांकडून माहिती जमा केली व ती अमेरिकेला विकली असाही आरोप करण्यात आला आहे.४अमेरिकेच्या सील कमांडोंनी अबोटाबाद येथील निवासस्थानी लादेनला ठार मारले. त्यानंतर या निवासस्थानात मिळालेली ही कागदपत्रे आहेत. अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी हा माहितीचा खजिना आहे, असे म्हटले आहे. ४ही कागदपत्रे मूळ अरेबिकमध्ये असून, त्यातील काही कागदपत्रे गुप्तचर खात्यातर्फे इंग्रजीत भाषांतरित करण्यात आली आहेत.
२६-११ चा मुंबईवरील हल्ला शौर्यपूर्ण
By admin | Updated: May 21, 2015 23:53 IST