शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

इक्वेडॉरमध्ये भूकंपात २३३ मृत्युमुखी

By admin | Updated: April 18, 2016 02:35 IST

इक्वेडॉरमध्ये झालेल्या भूकंपात २३३ जण मृत्युमुखी पडले तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद ७.८ इतकी नोंदविली गेली. उपराष्ट्रपती जॉर्ज ग्लास यांनी

क्विटो : इक्वेडॉरमध्ये झालेल्या भूकंपात २३३ जण मृत्युमुखी पडले तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद ७.८ इतकी नोंदविली गेली. उपराष्ट्रपती जॉर्ज ग्लास यांनी ही माहिती दिली. दरम्यान, भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा सुरुवातीस देण्यात आला होता पण, नंतर हा धोका बहुतांश टळल्याचे सांगण्यात आले. या भूकंपात ५८८ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भूकंप झाला. इक्वेडॉरसह उत्तरी पेरु आणि दक्षिणी कोलंबियातही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, इक्वेडॉरमध्ये सहा प्रांतात आपत्कालिन स्थिती घोषित करण्यात आली आहे. तथापि, इक्वेडॉरचे राष्ट्रपती राफेल कोरेया हे इटलीचा दौरा अर्धवट सोडून स्वदेशी परतत आहेत. मृत आणि जखमींचा आकडा वाढू शकतो अशी भीती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण, भूकंपाने प्रभावित असलेल्या अनेक भागात अद्याप मदतकार्य पोहचू शकलेले नाही. भूकंपाचे केंद्र असलेल्या पेडरनल शहरात १२ पेक्षा अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या असल्याची माहिती या शहराचे महापौर गाबरियेए अल्सिवर यांनी दिली. आम्ही मदत कार्य सुरु केले आहे. या भूकंपात पूर्ण शहरच उद्ध्वस्त झाल्याचे या महापौरांनी सांगितले. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनंतर राजधानी क्विटोमध्ये नागरिक घराबाहेरुन थेट रस्त्यावर आले आहेत. देशात अनेक भागात हीच परिस्थिती आहे. पोर्टोविजो शहरात १६, मंतामध्ये १० तर गुयास भागात दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. देशातील जियोफिजिक्स इन्स्टिट्यूटने सांगितले की, या भूकंपाने गुयाक्विल आणि भूकंपाचे केंद्र असलेल्या भागात अधिक नुकसान झाले. राजधानी क्विटोमध्ये वीज आणि फोन सेवा बंद पडली आहे. नागरिक व्हॉटसअ‍ॅपच्या मदतीने एकमेकांच्या संपर्कात आहेत. कधी आणि कुठे?हा भूकंप शनिवारी रात्री आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ११ वाजून ५८ मिनिटांनी क्विटोपासून १७० किमी उत्तर पश्चिम भागात झाला. या भूकंपाचे धक्के तब्बल एक मिनिट जाणवले. इक्वेडॉर, उत्तर पेरू आणि दक्षिण कोलंबियात हा भूकंप जाणवला. मोठ्या भूकंपानंतर कमी तीव्रतेचे भूकंपाचे ५५ धक्के जाणवल्याचे उप राष्ट्रपती जॉर्ज ग्लास यांनी सांगितले. टोंगो बेटही भूकंपाने हादरले सिडनी : दक्षिण-पूर्व प्रशांत महासागरातील टोंगो बेटही भूकंपाने हादरले. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने सांगितले की,भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ एवढी नोंदली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी नुकुअलोफापासून २७७ कि.मी. आणि दक्षिण-पूर्वमध्ये ६६ कि.मी. खोल होता.