शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विमान अपघातात २३ जण ठार

By admin | Updated: February 25, 2016 03:23 IST

नेपाळच्या पर्वतीय प्रदेशात उड्डाण करताना एक छोटे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त होऊन विमानातील सर्व २३ जण मरण पावले. त्यात दोन विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

काठमांडू : नेपाळच्या पर्वतीय प्रदेशात उड्डाण करताना एक छोटे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त होऊन विमानातील सर्व २३ जण मरण पावले. त्यात दोन विदेशी नागरिकांचा समावेश आहे. विमान दुर्घटनाग्रस्त झाले त्यावेळी हवामान खराब होते आणि समोरचे स्पष्ट दिसत नव्हते.तारा एअरचे टिष्ट्वन-ओट्टर विमान पोखरा विमानतळावरून जोमसोमसाठी उड्डाण करताच काही मिनिटातच बेपत्ता होऊन दुर्घटनाग्रस्त झाले.राजधानी काठमांडूपासून २०० कि.मी. पश्चिमेला पोखरा हे रिसॉर्टचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. अनेक गिर्यारोहक जोमसोम येथून हिमालयात गिर्यारोहणास प्रारंभ करतात. विमानात २ विदेशी नागरिक आणि २ मुले यांच्यासह २० प्रवासी होते. या विदेशी नागरिकांत एक चिनी आणि एक कुवैती असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित प्रवासी नेपाळचे नागरिक आहेत.पोखरा झोनल पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने स्थानिक लोकांचा हवाला देऊन सांगितले की, उत्तर नेपाळमधील मुस्तांग आणि म्याग्दी जिल्ह्यांच्या दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले. शोधकार्यासाठी काठमांडूहून तीन हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर नेपाळी लष्कर, पोलिसांनाही दुर्घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.विमान कंपनीने आपल्या वेबसाईटवर मात्र हवामान चांगले होते आणि नियंत्रण कक्षाने विमान उड्डाणाला परवानगी दिली होती, असा दावा केला आहे. विमान नेमके कशामुळे दुर्घटनाग्रस्त झाले हे कळू शकले नाही.आतापर्यंत ७०० नागरिक ठारनेपाळमध्ये १९४९ मध्ये पहिले विमान उतरले होते. तेव्हापासून आतापर्यंत तेथे ७० पेक्षा अधिक विमान किंवा हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. त्यात किमान ७०० पेक्षा जास्त नागरिक ठार झाले आहेत. युरोपीय संघाने २०१३ मध्ये सर्व नेपाळी विमान कंपन्यांना तेथे उड्डाण करण्यास बंदी घातली होती. २०१४ मध्ये नेपाळ एअरलाईन्सचे एक विमान पश्चिमेला बर्फाच्छादित पर्वतावर आदळून दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यात १८ जण मरण पावले होते.