शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

२१ वे शतक आशियाई देशांचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 21, 2015 12:30 IST

आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर संमेलनात केले

ऑनलाइन लोकमत
क्वालालांपूर, दि. २१ - भारत व आसिआन देश हे नैसर्गिक मित्र असून, फार पूर्वीपासून आमचे नाते जोडले गेले आहे, त्यात कोणताही दुरावा नाही. आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर संमेलनात केले. मलेशिया व सिंगापूरच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान मोदी आज दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) शिखर परिषदेत बोलत होते. 
आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले आशियाई देश एकत्र येऊन आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकतात, २१ वे शतक हे आशियाचे बनवण्याची जबाबादारी भारताची अाहे, असे ते म्हणाले.
भारताचा आर्थइक आलेख पाहता, आम्ही पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होऊन ती मजबूत होत असल्याचे दिसत आहे, असे मोदी म्हणाले. भारतात या व येत्या काही वर्षांत आर्थिक विकास पहायला मिळेल अशी आशा जागतिक बँक व आयएमएफनेही व्यक्त केल्याचे सांगत आमच्या देशातील आर्थिक बदलाचे वारे अनुभवण्यासाठी  आपणही यावे, असे निमंत्रण मोदींनी परिषदेत दिले. 
गेल्या १८ महिन्यात देशाचा विकास तर झालाच पण महागाई कमी झाली आहे. गेल्या वर्षभरात  जन-धन योजनेअंतर्गत तब्बल १९ कोटी नागरिकांची बँक खाती सुरू करण्यात आली आहेत. भारताला वैश्विक निर्मिती केंद्र बनवण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अर्थव्यवस्थेला मजबूती येत असून, कृषी क्षेत्रच आमचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. कराच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नात देशांतर्गात उत्पन्नात वाढ झाली आहे. व्याजदरांत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे मोदी म्हणाले. भारतात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत असून, सध्या दररोज  १४ ते २३ किमी अंतराचे महामार्ग बांधण्यात येत आहेत. गेल्या अनेक वर्षांची वर्षांची परंपरा मोडीत काढून आम्ही भारतात परकीय गुंतवणुकीला चालना दिल्याचेही मोदींनी नमूद केले.