शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
9
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
10
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
11
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
12
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
13
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
14
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
15
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
16
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
17
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
18
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
19
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
20
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप

२१वे शतक आशियाचे - पंतप्रधान

By admin | Updated: November 22, 2015 01:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दहशतवादाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आसियानशी सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यासह प्रादेशिक वाद शांततापूर्ण

क्वालालम्पूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दहशतवादाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आसियानशी सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यासह प्रादेशिक वाद शांततापूर्ण रीतीने मिटविण्याची गरजही अधोरेखित केली. २१ वे शतक आशियाई देशांचेच असेल, असा विश्वास व्यक्त करून मोदींनी जगाचा भारतावरील विश्वास वाढत असल्याचे नमूद केले. मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेले मोदी शनिवारी दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसियान) शिखर परिषदेत बोलत होते. मोदी म्हणाले की, दहशतवाद जगासमोरील सर्वात मोठे आव्हान बनला असून, आम्हा सर्वांना प्रभावित करीत आहे. भारत व आसियान देश हे नैसर्गिक मित्र असून, फार पूर्वीपासून आमचे नाते जोडले गेले आहे, त्यात कोणताही दुरावा नाही. आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे मोदी म्हणाले. भारताचा आर्थिक आलेख पाहता, आपण पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होऊन ती मजबूत होत असल्याचे दिसत आहे, असे मोदी म्हणाले. भारतात या व येत्या काही वर्षांत आर्थिक विकास पाहायला मिळेल, अशी आशा जागतिक बँक व आयएमएफनेही व्यक्त केल्याचे सांगत आमच्या देशातील आर्थिक बदलाचे वारे अनुभवण्यासाठी आपणही यावे, असे निमंत्रण मोदींनी परिषदेत दिले. गेल्या १८ महिन्यांत देशाचा विकास तर झालाच; पण महागाईही कमी झाली आहे. कर उत्पन्नात देशांतर्गात उत्पन्नात वाढ झाली आहे. व्याजदरांत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)