इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यांत २१ अतिरेकी ठार झाले. गुरुवारी सकाळी लष्कराने आकाखेल आणि सिपाह भागात ही कारवाई केली. दहशतवाद्यांचे पाच अड्डे नष्ट झाले. या कारवाईच्या एक दिवस आधी पीर मेला भागातील शांतता समितीच्या बैठकीत घडविण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटात ५ जण ठार झाले होते. खैबरच्या शकास भागात सुरक्षा दलांनी झडती सुरू केली आहे. या भागात तालिबान, दुसऱ्या अतिरेकी संघटना आश्रयाला आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
२१ अतिरेक्यांचा पाकमध्ये खात्मा
By admin | Updated: October 22, 2014 05:10 IST