शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कामगारांना २ कोटी डॉलरची भरपाई

By admin | Updated: July 17, 2015 04:32 IST

कॅटरिना चक्रीवादळानंतर तेल रिंग व इतर सुविधांच्या दुरुस्तीसाठी अमेरिकेत आणण्यात आलेल्या २०० भारतीय कामगारांची फसवणूक व त्यांचे शोषण केल्याच्या प्रकरणात आरोपी

न्यूयॉर्क : कॅटरिना चक्रीवादळानंतर तेल रिंग व इतर सुविधांच्या दुरुस्तीसाठी अमेरिकेत आणण्यात आलेल्या २०० भारतीय कामगारांची फसवणूक व त्यांचे शोषण केल्याच्या प्रकरणात आरोपी कंपनी व कामगारांत दोन कोटी डॉलरच्या भरपाईवर तडजोड झाली आहे. अमेरिकी इतिहासातील कामगारांच्या तस्करीचे हे सर्वांत मोठे प्रकरण आहे. सिग्नल इंटरनॅशनलविरुद्ध कामगारांच्या तस्करीच्या अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा समझोता करण्यात आला आहे. एका केंद्रीय ज्युरींनी भारतीय कामगारांची फसवणूक, शोषण केल्याप्रकरणी सिग्नलला अलीकडेच दोषी ठरविले होते. २००५ मध्ये कॅटरिना वादळामुळे हानी झालेल्या तेल रिंग, इतर सुविधांच्या दुरुस्तीसाठी या कामगारांना भारतातून आणण्यात आले होते. वेल्डर, प्लंबर आणि इतर प्रकारचे काम मिळावे यासाठी कामगारांनी कंपनी आणि एका वकिलाला १० ते २० हजार डॉलर किंवा त्याहूनही अधिक रक्कम भरती शुल्क व इतर शुल्क म्हणून दिली होती. या कंपनीने भारतीय कामगारांना चांगल्या नोकऱ्या, ग्रीन कार्ड आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अमेरिकेत घर देण्याचेही आश्वासन दिले होते. अनेक कामगारांची कंपनीने भरती व इतर शुल्कापोटी मागितलेली रक्कम देण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे त्यांनी मालमत्ता विकून किंवा कुटुंबियांवर कर्जाचा बोजा टाकून ही रक्कम भरली होती, असे या खटल्यात कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदर्न पॉवर्टी लॉ सेंटरने सांगितले.होते नव्हते ते विकून अथवा कर्ज काढून हे कामगार २००६ मध्ये अमेरिकेत आले. तेव्हा ग्रीन कार्ड किंवा कायम रहिवासाचा परवाना मिळणार नसल्याचे त्यांना कळाले. हा त्यांच्याकरिता पहिला मोठा धक्का होता. त्यानंतर त्यांना दयनीय अवस्थेतील कामगार छावण्यांत ठेवून राहण्याच्या मोबदल्यात दरमहा १,०५० डॉलर देण्यास भाग पाडले गेले होते. (वृत्तसंस्था)